दहशतवाद्यांनी राजौरी शहरातील खंडली पुल भागात भाजपचे मंडल अध्यक्ष जसबीर सिंह (BJP Mandal President Jasbir Singh) यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला (Grenade attack) केला  Dainik Gomantak
देश

राजौरीत भाजप अध्यक्षावर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेट हल्ला, 1 ठार 6 जखमी

सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांना वाटले की, घरात सिलेंडरचा स्फोट झाला आहे. परंतु नंतर हा ग्रेनेड हल्ला असल्याचे स्पष्ट झाले. लोकांनी या हल्ल्यातील जखमींना राजौरी रुग्णालयात नेले. जिथे उपचारादरम्यान तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

राजौरी: स्वातंत्र्य दिनाच्या (Independence day) दोन दिवस आधी गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी राजौरी शहरातील खंडली पुल भागात (In Khandali bridge area of Rajouri city) भाजपचे मंडल अध्यक्ष जसबीर सिंह (BJP Mandal President Jasbir Singh) यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला (Grenade attack) केला आहे. या हल्ल्यात जसबीर सिंगचा तीन वर्षांचा पुतण्या ठार झाला आणि त्याच्या पालकांसह कुटुंबातील इतर सहा सदस्य गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना राजौरीच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांच्या शोधात संपूर्ण परिसराला वेढा घालून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस आणि लष्कराचे उच्च अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी हजर होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जसबीर सिंह यांचे कुटुंब रात्री साडेनऊच्या सुमारास घराच्या अंगणात बसले होते. या दरम्यान, दहशतवाद्यांनी घराच्या छतावर चढून ग्रेनेड फेकल्याने झालेल्या स्फोटात जसबीर सिंह यांचे संपूर्ण कुटुंब या स्फोटाच्या गर्तेत आले आहे. सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांना वाटले की, घरात सिलेंडरचा स्फोट झाला आहे. परंतु नंतर हा ग्रेनेड हल्ला असल्याचे स्पष्ट झाले. लोकांनी या हल्ल्यातील जखमींना राजौरी रुग्णालयात नेले. जिथे उपचारादरम्यान तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.

स्फोटाची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी पोहोचले. ग्रेनेडचा लीव्हरही गुन्हेगारीच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत दहशतवाद्यांचा कोणताही शोध लागला नाही. संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

भाजप मंडळाचे अध्यक्ष जसबीर सिंह यांचे संपूर्ण कुटुंब देशभक्त आहे. जसबीर यांच्यासह चार भाऊ आणि वडील लष्करातून निवृत्त झाले आहेत. ते बऱ्याच काळापासून समाज आणि देशभक्तीचा आवाज उठवत आहेत. जसबीर सिंह सेना सेवानिवृत्त झाल्यानंतर ते विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाशी संबंधित होते. नंतर ते भाजपमध्ये सामील झाले. जसबीरने या भागातून नगर परिषदेच्या प्रभाग सदस्याची निवडणूकही लढवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT