Temple
Temple Dainik Gomantak
देश

Unlock-6: या राज्यातील मंदिरे चार महिन्यांनंतर खुले

दैनिक गोमन्तक

पाटणा: बिहारमध्ये (Bihar) कोरोना संसर्ग (Covid-19) नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने (Government) निर्बंध हळूहळू शिथिल देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता अनलॉक-6 नुसार आजपासून सर्व दुकाने, हॉल, शॉपिंग मॉल, बाग, धार्मिक स्थळ सामान्य रूपाने सुरू झाले. तब्बल चार महिन्याच्या खंडानंतर बिहारमध्ये मंदिराचे (Temple) दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी ट्विट करत अनलॉक-6 ची माहिती दिली.

नितीशकुमार यांनी म्हटले की, राज्यातील कोविड स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील परिस्थिती सुधारत असल्याने सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, गार्डन आणि धार्मिक स्थळ खुले करण्यात येत आहेत. तत्पूर्वी बिहारमध्ये आतापर्यंत मिळालेल्या सवलतीचा विचार केल्यास दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. तसेच दुकाने आणि मॉलमध्ये काम करणाऱ्या लोकांना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबतची खातरजमा पोलिसांकडून केली जात आहे. याशिवाय शाळेत कर्मचारी आणि शिक्षकांना कोविड प्रतिबंधक लस घेणे आवश्‍यक आहे.

ऑटो, बस आणि सार्वजनिक वाहनांत क्षमतेनुसार प्रवासी नेण्याची परवानगी दिली आहे. परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता सर्व नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन आवश्‍यक असल्याचेही मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोविडचे नियम पाळणार

बिहारमध्ये चार महिन्यानंतर मंदिरे भाविकांसाठी खुले करण्यात आले. पाटण्यातील महावीर मंदिरात भाविकांची गर्दी होती. महावीर मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणाले की, मंदिरात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असून त्यानुसार भाविकांना दर्शन घेता येईल. शनिवारी आणि मंगळवारी भाविकांची गर्दी राहू शकते. भाविकांसाठी मंदिराचा केवळ तळमजला खुला करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

MLA Disqualification: लक्षात आहे ना? अपात्रता याचिकेबाबत अमित पाटकरांचे सभापतींना स्मरणपत्र

Margao News : सुरक्षेअभावी औद्योगिक अपघात; नवीन औद्योगिक धोरणामध्ये घातक प्रकल्‍पांना थारा न देण्‍याकडे कल

Amit Shah: शेअर बाजारातील घसरणीवर अमित शाह स्पष्टच बोलले; 4 जूननंतर....!

Netravali: नेत्रावळीत शिकारीचा संशय; कदंबचे 'ते' 16 कर्मचारी जामिनानंतर सेवेतही रुजू

SCROLL FOR NEXT