Telangana CM Revanth Reddy Dainik Gomantak
देश

Lok Sabha Election 2024: तेलंगणाचे CM रेवंत रेड्डी यांची जीभ घसरली; PM मोदींना म्हणाले 'काळा साप'

Telangana CM Revanth Reddy: मुख्यमंत्री रेड्डी यांनी शुक्रवारी निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केली.

Manish Jadhav

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहे. तर दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. काल देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. विरोधकांवर हल्लाबोल करताना शिष्टाचाराची मर्यादा ओलांडण्यासही नेते मागे-पुढे पाहत नाहीत. काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेच केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री रेड्डी यांनी शुक्रवारी निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केली. रेवंत रेड्डी यांनी डिसेंबर 2021 मध्ये मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांचा उल्लेख केला. यासोबतच त्यांनी नरेंद्र मोदींना 'काळा साप' म्हटले. हा काळा साप असा आहे की, जो निवडणुक जिंकल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना चावायला येईल.

रेवंत रेड्डी म्हणाले- नरेंद्र मोदी ‘पराजय’ विसरणार नाहीत.

झहीराबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुरेश शेटकर यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री रेड्डी बोलत होते. रेड्डी म्हणाले की, मोदी "पराभव" विसरणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, "हजारो शेतकऱ्यांनी मोदींविरोधात लढा दिला. त्यांना तीन कृषी कायदे मागे घेण्यास आणि माफी मागायला भाग पाडले. पण ते काळ्या सापासारखे आहेत. ते शेतकऱ्यांच्या विरोधातील राग आपल्या मनात ठेवतील." दरम्यान, नरेंद्र मोदी यांचा 400 जागा जिंकण्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे, असेही रेड्डी म्हणाले. दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कॉर्पोरेटचे गुलाम बनवण्यासाठी त्यांना हे करायचे असल्याचे देखील ते म्हणाले.

तेलंगणाचे पहिले काँग्रेस मुख्यमंत्री रेवंत रेड्डी कोण आहेत?

रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे पहिले काँग्रेस मुख्यमंत्री आहेत. तेलंगणामध्ये 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. यानंतर रेवंत रेड्डी मुख्यमंत्री बनले. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते खासदार आणि तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष होते. जून 2021 मध्ये त्यांना तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी रेवंत रेड्डी हे टीडीपीचे मोठे नेते होते. 2006 मध्ये त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. ते मलकाजगिरीचे खासदार होते. रेड्डी 2014-2018 या काळात कोडंगल मतदारसंघातून आमदार होते. रेड्डी 2009 ते 2014 पर्यंत आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी ABVP कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

SCROLL FOR NEXT