Dancing Teacher Viral Video Dainik Gomantak
देश

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Dancing Teacher Viral Video: एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये एका कॉलेजमधील विभागप्रमुख बॉलिवूडच्या 'मुकाबला मुकाबला' या गाजलेल्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

Sameer Amunekar

एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये एका कॉलेजमधील विभागप्रमुख (एचओडी) बॉलिवूडच्या 'मुकाबला मुकाबला' या गाजलेल्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा डान्स कोणत्याही स्टेजवर नव्हे, तर थेट वर्गात विद्यार्थ्यांसमोर.

व्हिडिओमध्ये दिसतं की वर्ग मोठ्या उत्साहात सजवण्यात आला आहे. गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या फुग्यांनी भरलेलं सुंदर वातावरण, वर्गाच्या मध्यभागी भव्य ब्लॅकबोर्ड आणि त्यासमोर नाचणारे एचओडी सर.

त्यांचा आत्मविश्वास आणि ऊर्जेने भरलेली स्टेप्स पाहून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांची साथ आणि प्रत्येक हालचालीला मिळणारा प्रतिसाद हे दर्शवत होतं की शिक्षक-विद्यार्थी नातं किती सुंदर असू शकतं.

शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी नेहमीच एक आदर्श असतात, पण त्यांना आपण बहुतेक वेळा केवळ शिस्तप्रिय आणि व्याख्यानांपुरतेच मर्यादित मानतो. मात्र या एचओडींच्या व्हिडिओने हे सगळं चित्र बदलून टाकलं आहे. त्यांचा डान्स म्हणजे केवळ नृत्य सादरीकरण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनाशी जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न होता.

या डान्समधून दिसून आलं की शिक्षकांमध्येही कलागुण असतात, त्यांच्यातही भावनांचा उफाळा आणि थोडीशी धमाल लपलेली असते. जेव्हा शिक्षक शिक्षणाबरोबरच थोडी मजा देखील करतात, तेव्हा शिक्षण एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतं.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सच्या प्रतिक्रिया अक्षरशः उसळल्या. अनेकांनी आपल्या भावना थेट कमेंट्समध्ये व्यक्त केल्या.

या व्हिडिओने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. शिक्षकही माणसेच असतात. त्यांच्यातही आनंद घेण्याची, नृत्य करण्याची आणि विद्यार्थ्यांशी खुलेपणाने संवाद साधण्याची ताकद असते. या व्हिडिओमधील एचओडी सरांनी दाखवून दिलं आहे की शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे जुळतात, तेव्हा शिक्षण अधिक प्रभावी, अर्थपूर्ण आणि संस्मरणीय बनतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT