चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटामुळे चर्चेत आहेच, पण त्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. गेल्या काही काळापासून वीर पहाडियासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या ताराने आता हे नाते संपवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले असून, या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
तारा आणि वीरच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांना प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोंच्या मुंबईतील कॉन्सर्टनंतर वेग आला. या कॉन्सर्टमध्ये तारा सुतारियाने स्टेजवर एपी ढिल्लोंसोबत परफॉर्मन्स दिला होता. सादरीकरणादरम्यान एपी ढिल्लों आणि तारा यांच्यातील केमिस्ट्री आणि एकमेकांना दिलेली मिठी यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.
याच कार्यक्रमातील वीर पहाडियाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला, ज्यामध्ये तो काहीसा अस्वस्थ आणि रागात असल्याचे दिसून आले. जरी वीरने नंतर स्पष्ट केले की त्याचे ते एक्सप्रेशन्स वेगळ्या गाण्यासाठी होते, तरीही या घटनेनंतर त्यांच्यातील बिनसल्याच्या बातम्या थांबलेल्या नाहीत.
फिल्मफेअरच्या अहवालानुसार, तारा आणि वीरने एकमेकांपासून वेगळे होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी गेल्याच वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये आपले नाते अधिकृतपणे जगासमोर आणले होते. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये हे जोडपे एकत्र दिसत असे. मात्र, वर्षभरानंतरच त्यांच्यात असं काय बिनसलं की त्यांना वेगळं व्हावं लागलं, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
ब्रेकअपच्या बातम्या वणव्यासारख्या पसरल्या असल्या तरी तारा सुतारिया किंवा वीर पहाडिया या दोघांपैकी कोणीही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांबद्दल कोणतीही पोस्ट केलेली नाही किंवा या अफवांचे खंडनही केलेले नाही. सध्या तारा तिच्या आगामी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे समजते, तर वीरचे चाहते त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.