Chief Minister Stalin Dainik Gomantak
देश

'हा इंडिया आहे, हिंदिया नाही', अमित शहांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री स्टालिन यांचा हल्लाबोल

Chief Minister Stalin: हिंदी दिनाऐवजी भारतीय भाषा दिन साजरा करण्यात यावा, असेही स्टालिन म्हणाले.

दैनिक गोमन्तक

Tamil Nadu Chief Minister MK Stalin: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या ‘हिंदी भाषा संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधते’ या विधानावर जोरदार प्रहार केला आहे. स्टालिन म्हणाले की, 'हा भारत देश आहे, हिंदिया नाही.' तामिळसह इतर भारतीय भाषांना केंद्र सरकारने अधिकृत भाषेचा दर्जा द्यावा. हिंदी दिनाऐवजी 'भारतीय भाषा दिन साजरा' करण्यात यावा.'

'विविधतेतील एकतेच्या आदर्शाविरुद्ध'

गुजरातमधील (Gujarat) अखिल भारतीय राजभाषा परिषदेतील अमित शहांच्या भाषणाचा संदर्भ देत, स्टालिन यांनी दावा केला की, 'शाह यांनी देशाची संस्कृती आणि इतिहास समजून घेण्यासाठी लोकांना हिंदी शिकण्याचा सल्ला दिला होता.'

DMK ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, स्टालिन म्हणाले की, देशात विविध भाषा बोलणारे लोक राहतात. अमित शहांकडून (Amit Shah) हिंदीचा पुरस्कार होणे राष्ट्राच्या विविधतेतील एकतेच्या विरोधात आहे.

'देशात फूट पाडण्याचा प्रयत्न योग्य नाही'

अहवालानुसार, स्टालिन आपल्या पक्षाच्या 'हिंदी लादण्या' विरोधात घेतलेल्या ऐतिहासिक भूमिकेचा संदर्भ देताना म्हणाले की, 'भारत' त्याच्या अखंडतेसाठी ओळखला जातो. 'हिंदी'च्या नावावर देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होऊ नये.' तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी केली की, 'राज्यघटनेच्या (Constitution) आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या तामिळसह 22 भारतीय भाषांना केंद्र सरकारने अधिकृत भाषेचा दर्जा द्यावा.'

म्हणाले- हिंदी दिनाऐवजी भारतीय भाषा दिन साजरा करावा

एवढेच नाही तर स्टालिन पुढे म्हणाले की, 'हिंदी दिन साजरा करण्याऐवजी भारतीय भाषा दिन साजरा करुन संस्कृती आणि इतिहासाला बळ दिले पाहिजे. मात्र, अमित शहांना स्थानिक भाषांची काळजी असेल तर त्यांनी हिंदी आणि संस्कृतच्या धर्तीवर तमिळसारख्या इतर भारतीय भाषांच्या विकासासाठी निधी द्यावा.'

स्टॅलिन शेवटी म्हणाले की, 'संस्कृती आणि इतिहास समजून घेण्यासाठी हिंदी शिकली पाहिजे, असे म्हणणे हे भारताच्या विविधतेतील एकतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. देशात विविध भाषा बोलणारे लोक राहतात. भारताचा इतिहास आणि संस्कृती फक्त हिंदी भाषेतूनच मांडता येते असे नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी! स्टार खेळाडूनं निवृत्ती मागे घेतली, T-20 आणि कसोटीतही खेळणार

'या दुःखद घटनेने मन हेलावले', हडफडे नाईटक्लब प्रकरणानंतर मालकाची पहिली प्रतिक्रिया; कोण आहे हा सौरभ लुथरा?

Goa Bus Stand: गुड न्यूज! गोव्यातील 'ही' बसस्थानके होणार चकाचक; जवळपास 400 कोटी खर्चून मिळणार अद्ययावत सुविधा

Serendipity Festival 2025: सेरेंडिपीटीत अवतरणार महाकाय नरकासुर! 5 वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार पाहायला; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

एकाच घरातील तिघी बहिणी, भाऊ आणि बॅचलर पार्टीसाठी आलेला 'इशाक'; हडफडे क्लब आगीमुळे एका क्षणात अनेक कुटुंबांवर शोककळा

SCROLL FOR NEXT