तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय,1 सप्टेंबरपासून होणार शाळा सुरु

राज्यात आता 1 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा उघडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
School
School Dainik Gomantak
Published on
Updated on

कोरोनाची दुसरी लाट (Covid 19) काहीशी ओसरु लागल्यामुळे तामिळनाडू सरकारने (Government of Tamil Nadu) राज्यातील शाळा उघडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता 1 सप्टेंबरपासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा (School) उघडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तथापि, शाळा आणि विद्यार्थ्यांना देखील कोरोनाशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांना परिसरातील स्वच्छतेबाबत विशेष उपाययोजना करावी लागेल. यासह, विद्यार्थ्यांना सहा फूट अंतराच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

शाळा 50% उपस्थितीसह चालतील: सरकार

यापूर्वी, 6 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने सांगितले होते की 9 वी, 10, 11 आणि 12 वीच्या शाळा मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्या वैद्यकीय तज्ञांच्या बैठकीनंतर पुन्हा सुरू केल्या जातील. सरकारने शाळांना एका वेळी 50% उपस्थितीसह कार्य करण्यास सांगितले होते. बुधवारी जारी केलेल्या एसओपीनुसार, सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची वैद्यकीय पथकांद्वारे एका आठवड्याच्या आत तपासणी केली जाईल आणि कोरोनाची लक्षणे असलेले विद्यार्थी किंवा कर्मचारी यांना शाळेच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

School
मुलींना मिळाला आणखी एक आधिकार, NDAची परीक्षा देता येणार

या व्यतिरिक्त, सरकारने असेही म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी पाण्याबरोबर सॅनिटायझर किंवा साबण पुरवले जातील याची खात्री करावी. सरकारने सांगितले की, मुलांना पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, मल्टीविटामिन गोळ्या आणि इतर इम्युनो-बूस्टर दिले जातील. असेही म्हटले होते की पात्र वयोगटातील विद्यार्थी तसेच शाळेत काम करणारे शिक्षक आणि इतर कर्मचारी यांचे 100% लसीकरण सुनिश्चित केले पाहिजे.

शाळांमध्ये 3 आठवड्यांचा ब्रिज कोर्स

तामिळनाडू शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन आठवड्यांचा ब्रिज कोर्स तयार केला आहे. शालेय शिक्षण मंत्री अंबिल महेश पोयमोझी उद्या राज्याच्या मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांशी (सीईओ) उद्या 19 ऑगस्ट रोजी शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत आणि विभागासमोरील आव्हानांबाबत सविस्तर बैठक घेणार आहेत.

School
अफगाणिस्तानातून सर्व भारतीयांना लवकरच परत आणू: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

तामिळनाडू राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) तीन आठवड्यांच्या ब्रिज कोर्ससाठी अभ्यासक्रम आणि साहित्य तयार केले आहे. एससीईआरटीमधील एक वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, जे ब्रिज कोर्ससाठी अभ्यास साहित्य तयार करणाऱ्या संघाचा भाग होते. ते म्हणाले की, इयत्ता नववीच्या रिफ्रेशर कोर्समध्ये विद्यार्थ्यांनी सहावी ते आठवीपर्यंत शिकलेल्या मूलभूत संकल्पना असतील.

School
अफगाण मुद्द्यावर पंतप्रधान मोदींची सुरक्षा समितीसोबत बैठक

ब्रिज कोर्स ऑफलाइन असेल

तज्ज्ञांनी सांगितले की, भाषेसाठी रिफ्रेशर कोर्स प्रामुख्याने व्याकरण, वाचन आणि लेखन कौशल्यांवर लक्ष केंद्रित करेल आणि ऑनलाईन धडे देखील ब्रिज कोर्सचा भाग म्हणून समाविष्ट केले जातील. शिक्षकांनी म्हटले की, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जे शिकवले जाईल त्यासाठी त्यांना उच्च माध्यमिक वर्गात काही पुरेसा वेळ मिळेल. तथापि, शाळेतील शिक्षकांचे मत आहे की ब्रिज कोर्स केवळ त्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल जे 1 सप्टेंबर रोजी शाळा उघडल्यानंतर ऑफलाइन वर्गात उपस्थित राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com