Crime Dainik Gomantak
देश

तामिळनाडूत एकतर्फी प्रेमातून अकरावीतील विद्यार्थिनीला भोकसलं

संशयिताचा मृतदेह मानापराई रेल्वे रुळाजवळ आढळला

दैनिक गोमन्तक

एकतर्फी प्रेमातून युवतींवर हल्ला होणे. या घटना देशात वारंवार होताना दिसत आहेत. अशीच एक घटना जून 2021 मध्ये तामिळनाडूतील त्रिचीजवळील अंतिकुलम घडली होती. एका 22 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून 16 वर्षीय विद्यार्थिनीला भोकसलं होतं. यानंतर आरोपीनं तब्बल 14 वेळा वार केले होते. या घटनेत मृत विद्यार्थिनी ही इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होती. घटनेच्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर ती आपल्या नातेवाईकाच्या घरी जात होती. (Tamil Nadu, out of one-sided love, a 21-year-old student was stabbed )

दरम्यान, अंतिकुलम रेल्वे पूलाजवळून जात असताना आरोपी केशवन याने तिला आडवलं आणि प्रेमाची मागणी केली. पण पीडितेनं आरोपीच्या प्रेमाला नकार दिला. यावेळी संतापलेल्या आरोपीनं पीडितेला धारदार चाकुने 14 वेळा भोकसलं आणि घटनास्थळावरून पळ काढला होता. या आरोपीचा मृतदेह काल रात्री उशिरा मानापराई रेल्वे रुळाजवळ आढळला आहे.

विशेष म्हणजे संबंधित मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी आरोपीवर आधीच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यानं पुन्हा पीडित मुलीचा पाठलाग सुरू केला आणि प्रेमाची मागणी केली. पण तिने नकार देताच आरोपीनं तिची हत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. पण त्याचा काही थांगपत्ता लागत नव्हता.

दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा मानापराई रेल्वे रुळाजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता संबंधित मृतदेह आरोपी केशवननचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. मृताच्या वडिलांनी याबाबत पुष्टी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

SCROLL FOR NEXT