V Senthil Balaji
V Senthil Balaji Dainik Gomantak
देश

Tamil Nadu: तामिळनाडूत राजकीय भूकंप, भ्रष्टाचाराचा आरोप करत राज्यपालांनी केली सेंथिल बालाजी यांची हकालपट्टी

Manish Jadhav

Tamil Nadu Politics: तामिळनाडूमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करणारे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना राज्यपाल आरएन रवी यांनी मंत्रिमंडळातून बडतर्फ केले आहे. मंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगपासून ते नोकरीच्या बदल्यात पैसे उकळण्यापर्यंतचे गंभीर आरोप आहेत.

या आरोपांमुळे त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 12 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या आरोपांमुळेच आता राज्यपालांनी पत्र काढून बालाजी यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी केली. राजभवनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

दरम्यान, 15 दिवसांपूर्वी भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्ही सेंथिल बालाजी यांच्या न्यायालयीन कोठडीत एक दिवस आधी म्हणजे 12 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. चेन्नईच्या सत्र न्यायालयाने बुधवारी हा आदेश दिला.

बुधवारी त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सत्र न्यायाधीश एस अली यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीशांनी मंत्र्यांना तुम्ही कसे आहात, असे विचारले, ज्यावर बालाजी यांनी मला खूप वेदना होत असल्याचे उत्तर दिले. वास्तविक, बालाजी सध्या बायपास सर्जरीनंतर रुग्णालयात (Hospital) विश्रांतीवर आहेत.

14 जून रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी

दुसरीकडे, 14 जून रोजी न्यायाधीशांनी बालाजी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. एका दिवसानंतर, अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) रुग्णालयात दाखल मंत्री बालाजी यांची चौकशी करण्याची परवानगी मिळाली होती.

मात्र, 24 जून रोजी ईडीने सत्र न्यायालयासमोर मेमो सादर केला. यादरम्यान, रुग्णालयात चौकशी करणे कठीण होत असल्याचे सांगत त्यांनी चौकशीची परवानगी देण्याची विनंती मागे घेतली होती.

तसेच, बालाजी यांची मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. परिवहन मंत्री असताना त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले होते. ते 2011 ते 2015 पर्यंत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIDMK) सरकारमध्ये मंत्री होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sports: पेडे-म्हापसा केंद्राची जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी; पाच स्पर्धा विक्रमांची नोंद

Goa Government: महत्त्वाकांक्षी ‘हर घर फायबर’ योजनेला केंद्र सरकारच्या असहकार्याचा ब्रेक

Konkani Poet Death: प्रसिद्ध काेंकणी कवी के. अनंत भट आणि साहित्यिक वि. ज. बोरकर यांचे निधन

Mhadei Water Dispute: म्‍हादई प्रश्‍नावर कुठलीही तडजोड करणार नाही; विरियातो फर्नांडिस

Nitin Gadkari In Goa: ''साखर बघितली तर चमचे आपोआप येतात...''; गोव्यात बोलताना नितीन गडकरी असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT