Tamil Nadu Government To Set Up Disney Like Theme Park In Chennai. Dainik Gomantak
देश

आता चेन्नईतही डिस्नेलँड सारखे थीम पार्क, तामिळनाडू उघडणार अ‍ॅडव्हेंचर, एंटरटेनमेंट अन् बीच टुरिझमचा खजिना

बॉलीवूड, कॉलीवूड, माहितीपट, परदेशी चित्रपट यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी एक स्वतंत्र चित्रपट पर्यटन योजना देखील सुरू केली जाणार आहे.

Ashutosh Masgaunde

Tamil Nadu Government To Set Up Disney Like Theme Park In Chennai:

तामिळनाडू सरकारने आपल्या नवीन पर्यटन धोरणानुसार, खाजगी क्षेत्राच्या सहभागातून चेन्नई शहराच्या जवळ डिस्नेलॅंड सारखे 100 एकरांचे थीम पार्क विकसित करण्याची योजना आखली आहे.

राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने नुकतेच त्यांचे पर्यटन धोरण जाहीर केले, ज्या अंतर्गत त्यांनी बारा प्राधान्य पर्यटन विभागांची रूपरेषा आखली आहे.

यामध्ये अ‍ॅडव्हेंचर टुरिझम, एंटरटेनमेंट टुरिझम, कारवां टुरिझम, बीच टुरिझम, हेरिटेज टुरिझम, इको टुरिझम, एमआयसीई टुरिझम आणि फिल्म टुरिझम यासारख्या 12 प्राधान्यांचा समावेश आहे.

डिस्नेलँड सारखे प्रस्तावित थीम पार्क मनोरंजन पर्यटनाचा एक भाग आहे.

“पर्यटन विभागाने डिस्ने आणि युनिव्हर्सल स्टुडिओ सारख्या जागतिक थीम पार्क प्रमाणेच, चेन्नईच्या बाहेरील बाजूस किमान 100 एकर क्षेत्रफळ असलेले एक मोठ्या स्वरूपातील मनोरंजन पार्क तयार करण्याची योजणा आखली आहे. मनोरंजन उद्यान खाजगी क्षेत्राच्या सहभागातून विकसित केले जाईल,” असे शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

भारतीय मनोरंजन पार्क क्षेत्र 500 मिलियन डॉलर्स इतके आहे, जे 49 बिलियन डॉलरच्या जागतिक उद्योगाच्या तुलनेत फक्त 1 टक्के आहे.

IBEF नुसार, भारतात असे फक्त 15-20 मनोरंजन पार्क आहेत. त्यांचा फूटफॉल वर्षाला 0.5 मिलियनहून अधिक आहे. यामध्ये प्रमुखांमध्ये इमॅजिका अ‍ॅडलॅब्स (लोणावळा), किंगडम ऑफ ड्रीम्स (गुडगाव), वंडरला (बंगलोर आणि कोची) यांचा समावेश आहे.

हे पर्यटन धोरण, धोरण अधिसूचनेच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा नवीन धोरण जाहीर होईपर्यंत वैध असेल. त्यात गोल्फ पर्यटनाला मनोरंजन पर्यटनाच्या अंतर्गत आवडीचे आणखी एक क्षेत्र म्हणूनही जोडले आहे.

“तामिळनाडूमध्ये अनेक गोल्फ कोर्स आहेत, जे मोठ्या प्रमाणावर डोंगराळ भागात आहेत. ज्यातून टेकड्या आणि वृक्षारोपणांचे नयनरम्य दृश्ये दिसतात. हे गोल्फ कोर्स आजूबाजूच्या शहरांमधून आणि चेन्नई आणि कोईम्बतूर येथे राहणाऱ्या पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करतात.

डोंगराळ प्रदेशात असलेल्या गोल्फ कोर्समध्ये निवास सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न होणार आहे. ज्याला मनोरंजन पर्यटनाची जोड दिली जाईल.

याशिवाय, तामिळनाडू बॉलीवूड, कॉलीवूड, माहितीपट, टीव्ही प्रॉडक्शन, परदेशी चित्रपट आणि शो आणि इतर प्रादेशिक चित्रपट या सर्व विभागांमध्ये चित्रपट पर्यटनाला चालना देण्याची योजना आखत आहे.

"तमिळनाडूमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोत्साहनांची रूपरेषा देणारी चित्रपट पर्यटन योजना स्वतंत्रपणे सुरू केली जाईल," असे सरकारी कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांनी तत्सम चित्रपट पर्यटन योजना यापूर्वीच जाहीर केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात खळबळ! नावेलीमधून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण, मडगाव पोलिसांकडून तातडीने शोध सुरु

IFFI 2025 Opening Ceremony: 56व्या इफ्फीची दणक्यात सुरुवात, गोव्याच्या चित्ररथांची मिरवणूक ठरली सांस्कृतिक आणि कलात्मक पर्वणी VIDEO

Delhi Blast Case: दिल्ली स्फोट प्रकरणी 'एनआयए'ची मोठी कारवाई! चार मुख्य आरोपींना अटक; 2900 किलो स्फोटकांचा साठा जप्त

IFFI 2025: गोवा बनलं जागतिक सिनेमाचं घर, 56व्या 'IFFI'चं थाटात उद्घाटन; CM सावंतांनी सिनेप्रेमींना दिला 'येवकार'

Viral Video: कोरियन महिला खासदारानं गायलं 'वंदे मातरम', फिल्म बाजारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT