Taliban Attack Google
देश

Taliban Attack Pakistan: तालिबानचा पाकिस्तानवर हल्ला; विविध भागात बॉम्बचा वर्षाव

Durand Line Tensions: या हल्ल्याने विवादित ड्युरंड लाइनच्या आजूबाजूला असलेल्या विविध ठिकाणांना निशाणा बनवले

Akshata Chhatre

Afghanistan Pakistan Conflict:

काबूल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, शनिवारी (२८ डिसेंबर) अफगाण मधील तालिबानने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. या हल्ल्याने विवादित ड्युरंड लाइनच्या आजूबाजूला असलेल्या विविध ठिकाणांना निशाणा बनवले, याचे प्रमुख कारण म्हणजे अफगाणिस्तानने नेहमीच पाकिस्तानची सीमा म्हणून या भागांना नाकारले आहे. अफगाण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी विमानांनी अफगाणिस्तानच्या सीमेच्या आत हवाईमार्गाने बॉम्बफेक केली, ज्यामध्ये अफगाणी नागरिक ठार झाले आणि म्हणूनच हा प्रतिहल्ला करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांनी पाकिस्तानमधील केवळ अशा भागांना लक्ष्य केले जिथे काही अन्यायी लोकं लपलेली आहेत. अफगाणी संरक्षण मंत्रालयाने या लोकांकडूनच अफगाणिस्तानवर हल्ला करण्यात आल्याचा देखील दावा केला गेलाय. अफगाणच्या निशाण्यावर पाकिस्ताला का आहे असा प्रश्न उपस्थित केला असता, मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खोवरझमी यांनी या प्रश्नाची पुष्टी केली नाही, ते म्हणालेत की त्यांना हा भाग पाकिस्तानचा वाटत नाही.

हल्ला केलेला भाग ड्युरंड सीमेशी जोडलेले आहे आणि ही सीमा ब्रिटिशांनी फार पूर्वी तयार केली होती. अफगाणिस्तान या रेषेला कायदेशीर सीमा म्हणून मान्यता देत नाही, तर पाकिस्तान याकडे कायदेशीर बंधनकारक आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून पाहतो.

दोन शेजारी देशांमधील संबंध सध्या पूर्णपणे बिघडले आहेत. पाकिस्तान अफगाणिस्तानवर दहशतवादी हल्ल्यांचे केंद्रबिंदू असल्याचा आरोप करतंय, मात्र अफगाण तालिबान या दाव्यांना फेटाळतात आणि केवळ पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे हे उत्तर असल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. अद्याप पाकिस्तानी सैन्य किंवा परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही आणि पुढील पावले काय असतील हे देखील स्पष्ट केलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT