Swami Swaroopanand ANI
देश

Swami Swaroopanand: द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दैनिक गोमन्तक

हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू आणि द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे आज निधन झाले. स्वामी स्वरूपानंद यांनी रविवारी वयाच्या 99 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील गोटेगावजवळील झोतेश्वर धाममध्ये त्यांचा मृत्यू झाला. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले स्वामी स्वरूपानंद शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्याकडे बद्री आश्रम आणि द्वारकापीठाची जबाबदारी होती. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते त्यांच्या आश्रमात होते. स्वामी स्वरूपानंद गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर नरसिंगपूर जिल्ह्यातील झोतेश्वर आश्रमात उपचार सुरू होते. त्यांनी आज दुपारी त्यांच्या आश्रमात अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद यांच्या शेवटच्या काळात त्यांचे शिष्य आश्रमात त्यांची सेवा करत होते.

स्वरूपानंद ब्रह्मलीन झाल्याची माहिती मिळताच भाविकांमध्ये शोककळा पसरली. आश्रमात त्यांच्या भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. मोठ्या संख्येने लोक झोतेश्वर आश्रमात पोहोचले आहेत. उद्या सोमवारी सायंकाळी 5 वाजता आश्रमातच त्यांना समाधी देण्यात येणार असल्याचे त्यांचे शिष्य ब्रह्मविद्यानंद यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT