Suspicious drone found near Jammu military bases  Dainik Gomantak
देश

जम्मूतील सैन्यस्थळाजवळ पुन्हा अढळले संशयास्पद ड्रोन

जम्मू काश्मीर येथील कालूचक आणि रत्नुचकमध्ये लष्करी केंद्रे आहेत तसेच सुंजवानमध्ये भारतीय सैन्याचा ब्रिगेड असून या तिन्हीही जागा भारतीय सैन्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत

दैनिक गोमन्तक

जम्मू एअरफोर्स(Jammu Kashmir) स्टेशनवर ड्रोन हल्ल्याची(Drone Attack) घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा शहरातील तीन सैन्य स्थळांजवळ(Military Base) संशयास्पद ड्रोन दिसले आहेत जम्मू जिल्ह्याचे एसएसपी चंदन कोहली यांनी ही माहिती दिली असून मंगळवारी रात्री साडे बारा ते साडेचार या दरम्यान रत्नुचक, कालुचक मिलिटरी स्टेशन आणि सुंजवान आर्मी ब्रिगेडजवळ ड्रोन पाहिल्याची माहिती सैन्याकडून पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान यावर बोलताना जम्मूचे एसएसपी चंदन कोहली म्हणाले, “मंगळवारी सकाळी काळूचक, रत्नुचक आणि सुंजवान येथे सैन्याने ड्रोन पाहिल्याचे आम्हाला सांगितले. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत.

जम्मू काश्मीर येथील कालूचक आणि रत्नुचकमध्ये लष्करी केंद्रे आहेत तसेच सुंजवानमध्ये भारतीय सैन्याचा ब्रिगेड असून या तिन्हीही जागा भारतीय सैन्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत मात्र आणखीन भारतीय सैन्याकडून सलग तिसर्‍या रात्री ड्रोन पाहण्याबाबत कोणतेही विधान आलेल नाही.यापूर्वी रविवारी हवाई दलाच्या स्टेशनवर दोन ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आले होते आणि स्फोटकेही टाकण्यात अली होती या हल्ल्यात हवाई दलाचे दोन जवानही जखमी झाले होते.

रविवारी झालेल्या या घटनेमध्ये लष्कर-ए-तैयबाचा हात असू शकतो, असा विश्वास सुरक्षा व गुप्तहेर अधिकाऱ्यांनी व्यक्त केल आहे तसेच यापूर्वी 14 मे 2002 रोजीही जम्मूमधील काळुचक मिलिटरी स्टेशनवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तानहून आले होते याचीही खात्री झाली आहे. हेच ते तीन अतिरेकी होते ज्यांनी यापूर्वी हिमाचल रोडवेज बसलाही आपले लक्ष केले होते ज्यात 7 नागरिक ठार झाले होते. यानंतर त्यांनी सैन्य ठाण्यात हल्ला केला आणि याच दहशतवादी हल्ल्यात 23 जण ठार झाले. यामध्ये 10 मुले आणि 5 सैनिकांचा समावेश होता.

आता या सगळ्या हल्ल्यांवरुन ड्रोनच्या रूपात भारतासमोर नवा सुरक्षा धोका निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या माध्यमातून सीमेपलिकडे बसलेले दहशतवादी भारतातील महत्त्वाच्या ठिकाणे हल्ल्यांसाठी लक्ष्य करू शकतात. दरम्यान दरम्यान, संयुक्त राष्ट्रात ड्रोनद्वारे दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्याचा मुद्दाही भारताने उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT