केंद्र सरकारचे पॅकेज म्हणजे आणखीन एक 'लबाडी', काँग्रेसची जहरी टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल लघु आणि मध्यम उद्योगांसाठी, आरोग्य सेवा क्षेत्रासाठी अधिक निधी, पर्यटन संस्था आणि मार्गदर्शकांना कर्ज आणि परदेशी पर्यटकांना व्हिसा फी माफ करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे
Rahul Gandhi Attacks on  central government's package
Rahul Gandhi Attacks on central government's packageDainik Gomantak

कोरोना महामारीच्या(Covid19) काळात ढासळलेल्या अर्थव्यस्थेला( Economy) सावरण्यासाठी तसेच या काळात अनेक उद्योग डबघाईला आलेत त्यांना सावरण्यासाठी काल केंद्रसरकारने(Central Goverment) मोठे पॅकेज जाहीर केले आहे. पण सरकारच्या या उद्दिष्टाबाबत शंका घेत काँग्रेसने(Congress) सरकारवर जहरी टीका केली आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) म्हणाले, "कोणतेही कुटुंब रोजच्या गरजा भागवून आर्थिक पॅकेज खर्च करू शकत नाही आणि हे पॅकेज लबाड आहे." अशी टीका त्यांनी केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल लघु आणि मध्यम उद्योगांसाठी, आरोग्य सेवा क्षेत्रासाठी अधिक निधी, पर्यटन संस्था आणि मार्गदर्शकांना कर्ज आणि परदेशी पर्यटकांना व्हिसा फी माफ करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. सरकारच्या याच धोरणावर बोलताना राहुल गांधी यांनी हि टीका केली आहे कोणतेही कुटुंब एफएमचे 'आर्थिक पॅकेज' त्यांच्या राहण्याच्या, खाण्याच्या,तसेच औषध आणि मुलांच्या फी वर खर्च करू शकत नाही. असे वक्तव्य त्यांनी यावेळी केल आहे.

Rahul Gandhi Attacks on  central government's package
अरे बाप रे! एकाच दिवशी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन वेळा दिली तीला लस

तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनीही या पॅकेजवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अशा संकटांचे उत्तर म्हणजे लोकांच्या हातात पैसे देऊन, विशेषत: गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या मागणीला उत्तेजन देणे गरजेचे असते.तसेच सरकारच्या या धोरणावर टीका करत चिदंबरमम्हणाले,": कर्जाची हमी देणे हे काही कर्ज नाही. क्रेडिट म्हणजे जास्त कर्ज असते. कोणताही बँकर कर्जबाजारी व्यवसायाला कर्ज देणार नाही,हेच खर सत्य आहे. अगोदरच कर्जबाजारी झालेल्या व्यवसायांना अधिक कर्ज नको असतात तर त्यांना कर्ज नसलेले भांडवल हवे असते".

यावरच काँग्रेसने आता सरकारने अर्थव्यस्था सावरण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलायला हवीत अशी मागणी काँगेसने केली आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com