Suryakiran 2023 War Exercise Dainik Gomantak
देश

Suryakiran 2023 War Exercise: भारत-नेपाळ सैन्य जगाला दाखवणार ताकद, उत्तराखंडमध्ये 7 दिवसांचा करणार 'सूर्यकिरण युद्ध' सराव

Suryakiran 2023 War Exercise: भारतीय लष्कर 24 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या सूर्यकिरण 2023 सरावासाठी सज्ज झाले आहे.

Manish Jadhav

Suryakiran 2023 War Exercise: भारतीय लष्कर 24 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या सूर्यकिरण 2023 सरावासाठी सज्ज झाले आहे. या सरावात सहभागी होण्यासाठी नेपाळी लष्करही भारतात पोहोचले आहे. हा सराव पिथौरागढमध्ये होणार आहे, ज्याला भारताचे ''न्यूझीलंड'' म्हटले जाते. या सरावात दोन्ही देशांचे 600 हून अधिक सैनिक सहभागी होत आहेत.

भारत आणि नेपाळचे सैन्य दरवर्षी लष्करी सराव करतात

दरम्यान, दरवर्षी नेपाळ (Nepal) आणि भारताचे सैन्य एकमेकांसोबत ऑल्टरनेट पद्धतीने सराव करतात. गेल्या वर्षी, सराव, ज्याची 16 वी आवृत्ती नेपाळमध्ये आयोजित करण्यात आली होती. सूर्यकिरण युद्ध सराव 2011 मध्ये दोन्ही देशांदरम्यान सुरु झाला होता.

दुसरीकडे, चीनने नेपाळवर वाईट नजर टाकण्यास सुरुवात केल्यामुळे हा सराव सुरु करण्यात आला. यानंतर, त्याचे वार्षिक आधारावर क्रमाने आयोजन केले जात आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या सरावाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ होतील. यासोबतच दोन्ही सैन्यामधील युद्धाभ्यास, समन्वय आणि एकजुटीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

याशिवाय, दहशतवादविरोधी कारवाया, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्य करण्याची क्षमता वाढेल. या सरावादरम्यान दोन्ही देशांचे सैन्य आपापले युद्ध अनुभव एकमेकांसोबत शेअर करतील.

या सरावात 600 हून अधिक सैनिक सहभागी होणार आहेत

नेपाळ लष्कराच्या तुकडीमध्ये तारा दल बटालियनचे प्रतिनिधित्व करणारे 334 जवान आहेत, तर कुमाऊं रेजिमेंटच्या बटालियनच्या नेतृत्वाखाली 354 जवानांच्या भारतीय सैन्य दलाचे नेतृत्व केले जात आहे. म्हणजेच एकूण 600 हून अधिक सैनिक या सरावात सहभागी होणार आहेत. हा सराव उत्तराखंडच्या (Uttarakhand) पिथौरागढमध्ये होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT