Indian Army: स्पेशल फोर्सेसना प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्या वर्टिकल विंड टनल UDAANची स्थापना, पहा व्हिडीओ

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते UDAAN टनलचे उद्घाटन करण्यात आले.
Indian Army First Vertical Wind Tunnel UDAAN
Indian Army First Vertical Wind Tunnel UDAANDainik Gomantak

Indian Army First Vertical Wind Tunnel UDAAN: स्पेशल फोर्सेसच्या व कॉम्बॅट फ्री-फॉलर्सच्या सैनिकांना स्काय डायव्हिंगच्या प्रशिक्षणासाठी भारतीय लष्कराने पहिला वर्टिकल विंड टनल तयार केला आहे. या टनलमध्ये सैनिक हवेत उडून फ्री फॉलसाठी आवश्य संतुलन राखण्यास शिकू शकतात.

याबाबतची माहिती भारतीय लष्कराच्या ट्विटर अकांऊटवरुन देण्यात आली. बुधवारी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते UDAAN या पहिल्या वर्टिकल विंड टनलचे उद्घाटन करण्यात आले.

Indian Army First Vertical Wind Tunnel UDAAN
Indian Army: भारतीय लष्कराचा 'चाणक्य रक्षा संवाद', टॉक शोमध्ये जगातील 'या' बलाढ्य शक्तींचा सहभाग

हिमाचल प्रदेशातील बकलोह येथील लष्कराच्या स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूलमध्ये हा टनल तयार करण्यात आला आहे. सैन्य दलाच्या सैनिकांचे कॉम्बॅट फ्री फॉल कौशल्य सुधारण्यासाठी अत्याधुनिक वर्टिकल विंड टनल तयार करण्यात आला आहे, असे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.

भारतीय सैन्यात बदल होत असल्याने प्रशिक्षण पद्धतींमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश केला जात आहे. कॉम्बॅट फ्री फॉल टनल फ्रीफॉल सिम्युलेटर म्हणून कार्य करत असतो.

वीडब्ल्यूटी आणि सीएफएफ विशिष्ट वेगाच्या हवेचे कॉलम तयार करीत असतात. हा सिम्युलेटर नियंत्रित वातावरण तयार करीत असतो. जे प्रशिक्षणार्थींना खऱ्या फ्री फॉल परिस्थितींचा अनुभव देऊन त्यांचे फ्री फॉल कौशल्य वाढविण्यास मदत करते.

लष्कराने सांगितले की ही सिम्युलेटर प्रणाली विविध फ्री फॉल परिस्थितींचे निर्माण करीत करते जे फ्री फॉलच्यावेळी वातावरणातील असंख्य परिस्थितींचे वैयक्तिक प्रतिक्रियांचे मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

वर्टिकल विंड टनल हवेतील संभाव्य अस्थिरता कमी करून पॅराशूट उघडताना प्रशिक्षणार्थींना फ्री-फॉल परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतो. वर्टिकल विंड टनल केवळ नवोदितांसाठीच फायदेशीर नाही, तर अनुभवी फ्री-फॉलर्स आणि कॉम्बॅट फ्री फॉल प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक चांगले साधन आहे.

प्रथम वर्टिकल विंड टनलची स्थापना भारतीय सैन्याच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी म्हणून करण्यात आली आहे. भारतीय लष्कराचा हा पहिलाच प्रकल्प आहे. जो स्पेशल फोर्सेसच्या जवानांना कॉम्बॅट फ्री फॉलचे सिम्युलेटेड प्रशिक्षण देते.

या सिम्युलेशन टनलचा वापर सैनिकांना आपल्या युद्धक्षेत्रातील ऑपरेशनमध्ये अचूकता साधण्यात होईल तसेच भविष्यातील फ्री फॉलच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सैनिक पूर्णपणे तयार राहतील.

Indian Army First Vertical Wind Tunnel UDAAN
Jammu and Kashmir: लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी ठार, सुरक्षा दलाची मोठी कारवाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com