Coromandel Express Accident Dainik Gomantak
देश

Odisha Accident : "आम्ही ट्रेनमधून रांगत बाहेर पडलो... सगळीकडे मृतदेह पडले होते", अपघातग्रस्तांचे वेदनादायक अनुभव

Ashutosh Masgaunde

Coromandel Express Accident

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवार 2 जून रोजी संध्याकाळी एक भीषण रेल्वे अपघात झाला. तीन ट्रेनच्या या अपघातात आतापर्यंत सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाबही समोर आले आहेत.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना, स्वत: अपघाताचा बळी असलेला एक प्रवासी म्हणतो, "काहींना हात गमवावे लागले होते, काहींचे पाय गमवावे लागले होते. कोणाचा चेहरा खराब झाला होता..."

अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेले दृश्य कथन केले. एका प्रवाशाने सांगितले की, आरक्षित श्रेणी असूनही डबे खच्चून भरलेले होते. ट्रेन उलटली, त्यावेळी प्रवासी झोपले होते.

त्याने पुढे सांगितले की, अचानक एक धक्का बसला, डोळे उघडले आणि त्यानंतर किमान 15 लोक त्याच्या अंगावर पडले. कसातरी जीव वाचवून बाहेर आल्याचे प्रवाशाने सांगितले. त्यांनी पाहिले की काहींना हात नाहीत, काहींना पाय नाहीत आणि काहींचे चेहरे खराब झाले आहेत. प्रवाशाने पुढे सांगितले की, त्याला अनेक ठिकाणी दुखापत झाली होती, पण सुदैवाने त्याचा जीव वाचला.

अपघाताबद्दल बोलताना ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या अन्य एका प्रवाशाने सांगितले की, संध्याकाळी 6.55 च्या सुमारास मोठा आवाज झाला आणि त्यानंतर ट्रेन उलटली. तेंव्हा काही समजले तेव्हा ट्रेनचा अपघात झाला होता. तात्काळ रुग्णवाहिका आणि बचाव दलाचे कर्मचारी दाखल झाले. त्यामुळे आम्हाला वेळेवर रुग्णालयात पोहोचवता आले.

अन्य एका प्रवाशाने सांगितले की, बोगी आणि टॉयलेटमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला.  आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले,

"ट्रेन सगळीकडे हादरत होती. रुळावरून घसरली होती..."

दुसरा प्रवासी म्हणाला,

"प्रथम, ट्रेन पुढे जात असताना, मला कळले की ट्रेन रुळावरून घसरली आहे. नंतर ट्रेन उलटली. सीट तुटली आणि माझ्यावर अंगावर पडली. मी त्याखाली अडकलो. दुसऱ्या माणसाने सीट काढून मला बाहेर काढले."

एका महिलेने तिच्यावरील आपबीती सांगितली. ती म्हणाली,

"आम्ही कोरोमंडलहून येत होतो. आणि मी वॉशरूमच्या आत होते,  तेव्हा मी पाहिले की ट्रेन अचानक पूर्ण झुकली आहे आणि मी ट्रेनच्या एका भागाला धरून बसले... मला स्वतःचा तोल राखता आला नाही. , मी केव्हाही ट्रेनच्या बाहेर फेकली गेली असती कारण माझी बोगी पूर्णपणे वाकली होती. यानंतर कुठे चप्पल, कुठे बॅग... सर्व सामान इकडे तिकडे हरवले होते. सगळे एकमेकांच्या अंगावर पडले.

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पियुष पोद्दारचाही अपघातात समावेश होता. तो वाचला. पियुष सांगतो की तो तामिळनाडूला जात होता. या घटनेची आठवण करून देताना पीयूष म्हणाला,

"आम्हाला एक धक्का बसला आणि अचानक आम्हाला ट्रेनची बोगी एका बाजूला वळताना दिसली. डबा वेगाने रुळावरून घसरला आणि धक्क्याने आमच्यापैकी अनेकांनी डब्यातून उड्या मारल्या. आम्ही कसेतरी रांगत यातून सुटलो. सगळीकडे मृतदेह पडलेले होते.

2 जून रोजी संध्याकाळी ओडिशात रेल्वे अपघाताची बातमी आली, तेव्हा मालगाडी आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्ये झालेल्या धडकेची बाब समोर आली. नंतर कळले की दोन नाही तर तीन गाड्या, एक मालगाडी, कोरोमंडल एक्सप्रेस आणि हावडा एक्सप्रेसची टक्कर झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT