Election Commission Dainik Gomantak
देश

Election Commission Appointments: आयुक्तांच्या निवडीबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय केले बदल

Election Commission: गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या आयुक्ताचे पद वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

दैनिक गोमन्तक

Supreme Court on Election Commission Appointments: भारतात निवडणूक आयोग हे घटनात्मक आणि स्वतंत्र आयोग आहे. देशातील निवडणूका निष्पक्ष व्हाव्या, वेळेत व्हाव्यात आणि निवडणूका व्यवस्थित पार पडाव्यात आणि लोकशाही टिकून राहावी यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे.

असे असले तरीही गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या आयुक्ताचे पद वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. ही बाब लक्षात घेऊन सुप्रिम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या आयुक्ताच्या निवडचे निकष बदलले आहेत.

आता निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निवडीसाठी समितीची स्थापना करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. पंतप्रधान, विरोधी गटनेता आणि सरन्यायाधीश यांचा निवडसमितीत समावेश असणार आहे.

संविधाना( Constitution)त केलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रपती निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची निवड करत होते. मात्र आता यामध्ये बदल दिसून येणार आहेत.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक( Election ) आयोगाचे प्रमुख आहेत. भारतात, देश आणि राज्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्षांचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT