Supreme Court 

 

Dainik Gomantak 

देश

पुढील 2 आठवडे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज होणार 'ऑनलाईन'

राजधानी दिल्लीत (Delhi) कोरोना विषाणूची 3000 हून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

दैनिक गोमन्तक

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची वाढती प्रकरणे लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांसाठी प्रत्यक्ष न्यायालयातील सुनावणी प्रक्रिया स्थगित केली आहे. आता पुढील दोन आठवडे न्यायालयात ऑनलाईन माध्यमातून सुनावणी होणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अधिसूचनाही जारी केली आहे.

राजधानी दिल्लीत (Delhi) कोरोना विषाणूची 3000 हून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. देशातील 23 राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराने (Omicron variant) धुमाकूळ माजवला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तयार केलेल्या कोविड-19 (COVID-19) डॅशबोर्डनुसार, रविवारी देशात कोरोनाचे 18000 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 284 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मार्च 2020 मध्ये कोविड-19 लॉकडाऊननंतर सुप्रीम कोर्टातील सुनावणी व्हर्च्युअल मोडवर वळली, परंतु वकील संघटना सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशनच्या दबावानंतर 28 ऑगस्ट रोजी एक SOP जारी केला. ज्यामध्ये हायब्रिड (भौतिक आणि आभासी) सुनावणीला परवानगी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT