Supreme Court Dainik Gomantak
देश

Supreme Court On CBI: 'तपासाचा हाच दर्जा असेल तर सीबीआय...', SC ने उच्च न्यायालयाचा आदेश केला रद्द

Supreme Court: तपासाचा हाच दर्जा असेल तर सीबीआयला बंद करणे कधीही चांगले, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

Manish Jadhav

Supreme Court on CBI: तपासाचा हाच दर्जा असेल तर सीबीआयला बंद करणे कधीही चांगले, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

माजी मंत्री वायएस विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी कडप्पाचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांना अटकेपासून संरक्षण देणारा तेलंगणा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला.

त्याचवेळी सीबीआयला प्रश्नोत्तराच्या धर्तीवर आरोपींची चौकशी करण्याचे निर्देश देण्यावरही आक्षेप घेतला.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'हा फौजदारी कायदा म्हणजे न्यायशास्त्राचे पुनर्लेखन करण्यासारखे आहे. अशा आदेशामुळे तपास निष्फळ ठरेल.

उच्च न्यायालय (High Court) संशयिताचा तपास लेखी स्वरुपात करण्याचे आदेश देऊ शकत नाही. उच्च न्यायालयाने पहिल्यांदा प्रतिवादीला प्रश्नावली देण्याचे आदेश देणे पूर्णपणे अनुचित होते.

अशा आदेशांचा विशेषत: तपासावर परिणाम होतो. सीबीआय अनेक आरोपींची भूमिका तपासत आहे. अशा स्थितीत उच्च न्यायालयाचे निर्देश अयोग्य होते.'

दुसरीकडे, खंडपीठाने अविनाश रेड्डी यांची संरक्षणाची मागणी फेटाळून लावली. सीबीआयला तपास पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिलची मुदत वाढवून 30 जून करण्यात आली.

अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी रेड्डी यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील रणजित कुमार यांच्या याचिकेवर खंडपीठाने म्हटले की, या प्रकरणात उच्च न्यायालय असे आदेश देऊ शकत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आम्ही खरोखरच अस्वस्थ आहोत.

सीबीआयने (CBI) तुम्हाला अटक करायची असती तर त्यांनी आधीच केली असती. सीबीआयने कमालीचा संयम दाखवला आहे. हे प्रकरण मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणीसाठी येत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण द्यावे, असे कुमार म्हणाले.

उच्च न्यायालयाच्या आदेशावर रेड्डी यांच्या मुलीने प्रश्न उपस्थित केले

मृत व्यक्तीची मुलगी डॉ. सुनीता रेड्डी यांचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी उच्च न्यायालयाच्या 18 एप्रिलच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, असा आदेश दिल्यास तो व्यर्थ ठरेल. तपासाचा हाच दर्जा असेल, तर सीबीआयला बंद करणे कधीही चांगले, असे खंडपीठाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने वायएसआरसीपी खासदाराला वायएस विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येशी संबंधित प्रकरणात चौकशीसाठी दररोज सीबीआयसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते आणि त्यांना 25 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते.

काय आहे प्रकरण

आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या बंधूंपैकी एक, विवेकानंद रेड्डी यांची राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी 15 मार्च 2019 रोजी रात्री कडप्पा जिल्ह्यातील पुलिवेंदुला येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT