SC Grants Bail to Munawar Faruqui: स्टँडअप कॉमेडीयन मुनव्वर फारूकी याला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने मुनव्वर यााल जामिन मंजूर केला असून त्याच्या विरोधातील सर्व तक्रारी इंदूर येथे हस्तांतरीत करण्यास सांगितले आहे.
मुनव्वर फारूकी हा स्टँडअप कॉमेडीयन असून त्याचा मोठा चाहता वर्ग देशभरात आहे. त्याने त्याच्या विविध स्टँडअप कॉमेडीमधून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.
सोमवारी सुप्रीम कोर्टाने फारुकी याच्या विरोधात दाखल केलेल्या सर्व एफआयआर इंदूर येथे स्थानांतरित करण्यास सांगितले. यात त्याने त्याच्या कार्यक्रमातून हिंदू देवतांवर केलेल्या कथित टिपण्णीच्या तक्रारीचाही समावेश आहे.
न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने मुनव्वर याला अटकेपासून संरक्षण तीन आठवड्यांसाठी वाढवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 5 फेब्रुवारी 2021 रोजी मुनव्वर याला अंतरिम जामिनावर मुक्त केले होते.
कोर्टाने तेव्हा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. मध्य प्रदेश न्यायालयाने त्याला जामिन नाकारताना त्याची सुटका करण्यास नकार दिला होता.
इंदूरच्या एका कॅफेमध्ये 1 जानेवारी 2021 रोजी झालेल्या मुनव्वरच्या कार्यक्रमाची आता स्क्रुटिनी केली जात आहे. भाजप आमदार मालिनी लक्ष्मण सिंह गौड यांचा मुलगा एकलव्य सिंग गौड यांनी मुनव्वर आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीत म्हटले होते की, मुनव्वरने हिंदू देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विनोद केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.