Supreme Court dismisses a plea of self styled godman and life convict Asaram Dainik Gomantak
देश

आसाराम बापूंना जामीन नाकारला; कोर्ट म्हणाले तुरुंगातच करा उपचार

सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करताना त्यांनी सांगितले होते की, त्यांना 6 आठवड्यांसाठी जामीन द्यावा जेणेकरून ते आयुर्वेदाच्या मदतीने आपले उपचार करू शकतील.

दैनिक गोमन्तक

बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित संत आसाराम बापुला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी आसाराम बापूला अंतरिम जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. आसारा बापुने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून वैद्यकीय कारणांसाठी 6 आठवड्यांसाठी जामीन मागितला होता.

सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करताना त्यांनी सांगितले होते की, त्यांना 6 आठवड्यांसाठी जामीन द्यावा जेणेकरून ते आयुर्वेदाच्या मदतीने आपले उपचार करू शकतील. या प्रकरणाची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आसारामला सांगितले, 'तुम्ही जो गुन्हा केला तो साधा गुन्हा नाही. तुरुंगात राहूनच उपचार करा.’

https://twitter.com/ANI/status/1432653417210544130यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयाने मे महिन्यात आसाराम बापूची अंतरिम जामीन याचिका फेटाळली होती. आसाराम यांनी तेव्हा देखील वैद्यकीय कारणांवरून अंतरिम जामीन मागितला होता. मागच्या वर्षी राजस्थान उच्च न्यायालयाने आसाराम बापुला कारागृहाबाहेरुन एक वेळचे जेवण मागवण्याची परवानगी दिली होती.

न्यायालयाने म्हटले की, आसाराम बापूला बाहेरून आणलेले अन्न देण्यापूर्वी कारागृह अधिकारी सखोल चौकशी करतील. त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी अनुकूल असलेले अन्न मागवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांचे वकील जे.एस. चौधरी यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT