Sidhu Moose Wala Dainik Gomantak
देश

'सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात राजकारण आणू नका', सुप्रीम कोर्टाचा सल्ला

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचे राजकारण करु नये, असा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Sidhu Moose Wala Case: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचे राजकारण करु नये, असा सल्ला दिला आहे. गँगस्टर लॉरेन्स विश्नोईच्या वडिलांनी दाखल केलेल्या दोन याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

दरम्यान, न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि अभय ओका यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत. अशा प्रकरणांमध्ये राजकीय पक्षांना स्थान नाही, असे आमचे मत आहे. कोण कोणत्या पक्षाचा आहे याने काही फरक पडत नाही. या न्यायालयाचे (Court) दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, मात्र या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका.'

दुसरीकडे, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंजाबमधील (Punjab) मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात सिद्धू मुसेवाला यांच्यावर हल्ला झाला होता. काही हल्लेखोरांना त्यांची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला आरोपी बनवले असून तो सध्या कोठडीत आहे. सिद्धू मुसेवाला काँग्रेसचे (Congress) नेते होते. ज्यांची सुरक्षा इतर 400 लोकांसह काढून घेण्यात आली होती. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा अर्जही भाजप नेते जगजित सिंग यांच्या वतीने दाखल करण्यात आला होता. याशिवाय बिश्नोईचे वडील लविंदर सिंग यांनीही अर्ज केला होता.

तसेच, या अर्जावर सुनावणी करताना खंडपीठाने सांगितले की, "पंजाब पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यावर तुम्ही राजकारण का करत आहात.' त्यावर पंजाब सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, ''लॉरेन्स बिश्नोईवर खून आणि खंडणीचे 57 गुन्हे दाखल आहेत. यानंतरही पंजाब पोलिसांना मिळालेल्या अटक वॉरंटला त्याच्या वडिलांनी आव्हान दिले आहे.''

सिंघवी पुढे म्हणाले, 'आमच्याकडे माहिती आहे की तो आंतरराष्ट्रीय शूटरच्या संपर्कात होता. ज्यांच्या माध्यमातून मुसेवालाची हत्या करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही त्याला कोठडीत ठेवू इच्छितो. आता अटक वॉरंटवर त्याला ताब्यात घेता येणार नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

Mumbai Indians: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! महेला जयवर्धनेनं सोडलं मुख्य प्रशिक्षकपद; IPL 2027 आधी मोठा बदल

Organic Agriculture: गोव्यात 10 टक्के क्षेत्रातही सेंद्रिय शेती नाही! रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगत उदय प्रभुदेसाई यांचे आवाहन

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT