Sukhoi Mirage Crash: एअरफोर्सच्या सुखोई आणि मिराज फायटरची विमानांची हवेत टक्कर होऊन मोठा अपघात घडला आहे. मध्यप्रदेशातील मुरैना येथे ही घटना घडली आहे.
शनिवारी सकाळी दहा ते साडेदहा दरम्यान हा अपघात झाला. सुखोई-30 आणि मिराज-2000 या दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. दोन्ही विमाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी क्रॅश झाली आहेत. यातील एक विमान राजस्थानातील भरतपूर येथे कोसळले आहे तर दुसरे विमान मध्यप्रदेशातील मुरैना येथे कोसळल्याचे सांगितले जात आहे.
तीनपैकी दोन पायलट वाचले असल्याचे मुरैना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुखोई विमान मध्यप्रदेशातील मुरैनाच्या पहाडगड येथे कोसळले तर दुसरे मिराज विमान राजस्थानातील भरतपूरच्या पिंगोरा येथे कोसळले. मुरैना येथे पडलेल्या सुखोईतील दोन्ही पायलट जखमी आहेत.
त्यांना ग्वाल्हेर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुरैनातील पहाडगड येथे एक हात आढळून आला आहे. हा हात भरतपूर येथे पडलेल्या मिराज लढाऊ विमानातील पायलटचा असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भरतपूर येथे एअरफोर्सचे पथक पोहचले आहे.
पोलिसांनी सांगितले की, भरतपूर येथे विमान क्रॅश झाल्यानंतर त्याचे अवशेष विखरून पडले. जिथे विमान कोसळले तिथे 7 फूट खोल खड्डा तयार झाला. तेथून विमानाचे पार्ट्स बाहेर काढले जात आहेत. ग्रामस्थांच्या माहितीनुसार दोन्ही विमांनांना हवेतच आग लागली होती.
दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले. वायुसेना आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली आहे. वायुसेना आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
चीफ ऑफ एअरस्टाफ यांनी या अपघाताची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना दिली आहे. संरक्षणमंत्र्यांनी या विमानांच्या पायलटविषयी चौकशी केली. तसेच या बाबतच्या घडामोडींवर ते लक्ष ठेऊन आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.