Agni Prime' missile Twitter/ DRDO
देश

'अग्नी प्राइम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; 1500 किमी मारक क्षमता

ओडिशाच्या (Odisha) किनाऱ्यावरुन भारताने सोमवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी अग्नी क्षेपणास्त्राच्या मालिकेतील 'अग्नी प्राइम' या क्षेपणास्त्राची (Agni Prime' missile) यशस्वी चाचणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

ओडिशाच्या (Odisha) किनाऱ्यावरुन भारताने सोमवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी अग्नी क्षेपणास्त्राच्या मालिकेतील 'अग्नी प्राइम' या क्षेपणास्त्राची (Agni Prime' missile) यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) (DRDO) बनवले आहे. अग्नी क्षेपणास्त्र हे 4000 किलोमीटरच्या रेंजचे अग्नी 4 आणि अग्नी 5 क्षेपणास्त्रातील तंत्रज्ञान एकत्र करुन हे क्षेपणास्त्र बनवण्यात आले आहे.

या क्षेपणास्त्राची रेंज 1000 ते 1500 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. तसेच 2 स्टेज आणि सॉलिड इंधनवर (Solid Fuels) आधारित अग्नी प्राइम क्षेपणास्त्राचा अ‍ॅडव्हान्स रिंग लेझर जायरोस्कोपवर (Advanced ring laser gyroscope) आधारित नेव्हीगेशन यंत्रणेद्वारे (Via Navigation System) वापर करण्यात येतो. त्याची मार्गदर्शक प्रणाली ही इलेक्ट्रो मेकेनिकल अ‍ॅक्ट्यूएटरने (Electro-Mechanical Actuator) सुसज्ज आहे. अग्नी 1 च्या सिंगल स्टेज उलट डबल स्टेज अग्नी प्राइम क्षेपणास्त्राचा रोड आणि मोबाईल लॉंचर (Mobile launcher) या दोन्हींच्या माध्यमातून वापर करण्यात येऊ शकतो.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अग्नी प्राइम हे कमी वजनाचे क्षेपणास्त्र आहे. अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची लांब पल्ला गाठण्याची क्षमता अधिक आहे. 1989 मध्ये भारताने मध्यम श्रेणीच्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्र आणि अग्नी 1 ची पहिल्यांदा चाचणी करण्यात आली होती. आता अग्नी 1 ची जागा अत्याधुनिक अशा अग्नी प्राइमने घेतली आहे. भारताने अग्नी क्षेपणास्त्र मालिकेची पाच क्षेपणास्त्र यशस्वीरपणे विकसित केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT