Success Story Pf Jai Choudhary, the son of a poor farmer left his job and set up a company worth 18 lakh crores. Dainik Gomantak
देश

Jai Choudhary: गरीब शेतकऱ्याच्या मुलाचा अमेरिकेत डंका, नोकरी सोडून उभारली 18 लाख कोटींची कंपनी

Ashutosh Masgaunde

Success Story of Jai Choudhary, the son of a poor farmer left his job and set up a company worth 18 lakh crores: आपल्यापैकी बरेच जण सतत काही ना काही तक्रार करत राहतात. तसे नव्हते म्हणून आम्ही ते करू शकलो नाही. असे असते तर खूप काही केले असते.

तक्रार करून ना आयुष्य बदलते ना वेळ. त्यामुळे इतिहास तेच लोक घडवतात जे कारणे न देता कष्ट करतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे जय चौधरी, जे भारतीय-अमेरिकन अब्जाधीश आहेत.

एक काळ असा होता की, जय चौधरी यांना शाळेत जाण्यासाठी 8 किलोमीटर चालावे लागत होते. आता जय चौधरी 71189 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. आणि 2018 मध्ये सर्वात श्रीमंत दहा भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांमध्ये नाव मिळवले आहे.

जाणून घेऊया एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा जय चौधरी यांची योशोगाथा...

संघर्ष

जय चौधरी यांना सुरुवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. जय यांच्या गावात वीज नव्हती. झाडाखाली बसून अभ्यास करावा लागायचा. एक काळ असा होता की जय चौधरी यांना शाळेत जाण्यासाठी 8 किलोमीटर चालत दुसऱ्या गावात जावे लागे.

एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले जय चौधरी बनारस हिंदू विद्यापीठातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पदवीधर आहेत.

अमेरिकेतील ओहायो येथील सिनसिनाटी विद्यापीठातून त्यांनी मास्टर्सही केले आहे. जय चौधरी सध्या अमेरिकेत असतात आणि तेथे त्यांनी आपल्या कामातून फक्त पैसेच नाही तर नावही कमावले आहे.

पत्नीची साथ

जय चौधरी यांनी जवळपास २५ वर्षे IBM, Unisys आणि IQ Software कंपन्यांमध्ये घालवली. 1996 मध्ये चौधरी आणि त्यांची पत्नी ज्योती यांनी नोकरी सोडली आणि त्यांच्याकडे असलेल्या पैशातून सिक्योर आयटी नावाची कंपनी स्थापन केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

1997 मध्ये त्यांनी सिफर ट्रस्टची स्थापना केली. या दोन्ही कंपन्या नंतर अनुक्रमे VeriSign आणि Secure Computing Corporation ने विकत घेतल्या.

पुढे त्यांनी AirDefense आणि CoreHarbor ची स्थापना केली, जी नंतर अनुक्रमे Motorola आणि AT&T ने खरेदी केली.

2007 मध्ये Zscaler ची स्थापना

2007 मध्ये, जय चौधरी यांनी Zscaler ही सायबर सुरक्षा फर्म स्थापन केली. ही कंपनी अमेरिकन शेअर बाजार Nasdaq मध्ये सूचीबद्ध झाली आहे.

जय चौधरी यांच्याकडे या कंपनीचा 42% हिस्सा आहे. Zscaler, एक क्लाउड सुरक्षा कंपनी आहे, जी ओपन इंटरनेट आणि SaaS अ‍ॅप्सवर सुरक्षित प्रवेश मिळवून देते.

Zscaler जगातील 400 पेक्षा जास्त कंपन्यांना सायबर सुरक्षा पुरवते. कंपनी झिरो ट्रस्ट एक्सचेंज प्लॅटफॉर्मची निर्माता देखील आहे. मार्च 2018 मध्ये Zscaler चा IPO आला, त्यानंतर जय चौधरी अब्जाधीश झाले.

कोरोना काळातही घोडदौड

कोरोना कालावधीत संपूर्ण जगाने वर्क फ्रॉम होम मॉडेल स्वीकारल्यामुळे Zscaler मध्ये अभूतपूर्व प्रगती झाली. Zscaler Microsoft, Siemens, CrowdStrike आणि AWS सह आघाडीच्या टेक कंपन्यांना सुरक्षा सेवा पुरवते.

2020 मध्ये, त्याचे नाव अमेरिकेतील सर्वात श्रीमंत लोकांच्या फोर्ब्स 400 च्या यादीत देखील आले, ज्यामध्ये ते 85 व्या क्रमांकावर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT