Student Died After Falling From Second Floor of Hostel In Jadavpur University Campus, Kolkata. Dainik Gomantak
देश

Jadavpur University: "आई मला भीती वाटतेय, प्लिज लवकर ये"; बिल्डिंगवरुन पडण्यापूर्वी विद्यार्थाचा फोन

Ashutosh Masgaunde

Student Died After Falling From Second Floor of Hostel In Jadavpur University Campus, Kolkata :

कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठातील वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याने घटनेच्या तासाभरापूर्वी आईला फोन केला होता.

विद्यार्थ्याने 100 किमी दूर राहणाऱ्या त्याच्या आईला सांगितले की तो घाबरला आहे आणि तिला लवकर येण्याची विनंती केली.

मुलाने आईला सांगितले की मला तुला खूप काही सांगायचे आहे. १८ वर्षीय विद्यार्थी रॅगिंगचा बळी ठरल्याचा आरोप कुटुंबीय आणि वर्गमित्राने केला आहे.

स्वप्नदीप कुंडू (Swapndeep Kundu) हा प्रथम वर्षाचा पदवीपूर्व विद्यार्थी होता आणि बुधवारी रात्री 11.45 च्या सुमारास विद्यापीठाच्या मुख्य वसतिगृहाच्या इमारतीच्या बाल्कनीतून पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे गुरुवारी पहाटे ४.३० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

स्वप्नदीपचे काका अरुप कुंडू म्हणाले, "स्वप्नदीप बुधवारी संध्याकाळी त्याच्या आईशी बोलला. त्याने आईला सांगितले की त्याला बरे वाटत नाही आणि तो घाबरला आहे."

त्याच्या आईने त्याला विचारले काय झाले. तो म्हणाला, "प्लिज लवकर ये. मला तुला अनेक गोष्टी सांगायच्या अनेक गोष्टी आहेत."

मग मी त्याला परत कॉल केला, फोन वाजत राहिला, पण त्याने उचलला नाही. सुमारे एक तासानंतर त्याच्या आई-वडिलांना फोन आला की त्यांचा मुलगा बिल्डिंगवरुन पडला आहे.

विद्यार्थ्याचे काका म्हणाले, "त्याचे शरीर पूर्णपणे झाकलेले होते, पण डॉक्टरांनी मला एक कागद दाखवला ज्यावर त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. जर ते रॅगिंग नव्हते तर ते कसे झाले."

स्वप्नदीपचे वडील रामप्रसाद कुंडू यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूला काही वसतिगृहातील लोक जबाबदार असल्याची तक्रार पोलिसांकडे केली.

स्वप्नदीपच्या वर्गमित्रांपैकी एक असलेल्या अर्पण माझी याच्या फेसबुक (Facebook) पोस्टनेही 'काही सिनिअर विद्यार्थ्यांच्या' रॅगिंगकडे लक्ष वेधले.

पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत भाष्य केलेले नाही आणि जाधवपूर विद्यापीठही शांत आहे. मात्र, पश्चिम बंगालचे (West Bengal) राज्यपाल सीव्ही आनंद बोस (CV Anand Bose) यांनी गुरुवारी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याच्या पालकांची भेट घेतली. जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन देत कुटुंबाला न्याय मिळेल, असे सांगितले.

नादिया जिल्ह्यातील कुंडसच्या मूळ गावी, बोगुला येथील लोकांनी स्वपनदीपच्या मृत्यूची योग्य चौकशी व्हावी आणि त्यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT