"संपत्ती लपवणे भ्रष्टाचारच, असे प्रकार करणाऱ्या उमेदवारांना अपात्र केले पाहिजे"; हाय कोर्टाची टिप्पणी

निवडणुका संसदेच्या, राज्य विधानमंडळाच्या असोत किंवा महानगरपालिका असोत किंवा पंचायत असोत त्या महत्त्वाच्या असतात. असे न्यायालयाने म्हटले.
Hiding Property is corruption, candidates who do such should be disqualified Says Karnataka High Court.
Hiding Property is corruption, candidates who do such should be disqualified Says Karnataka High Court.Dainik Gomantak
Published on
Updated on

Hiding Property is corruption, candidates who do such should be disqualified Says Karnataka High Court:

कोणत्याही निवडणुकीला उभारणाऱ्या उमेदवाराने पती किंवा पत्नीची संपत्ती लपवणे हा भष्टाचार आहे. अशी टिप्पणी कर्नाटक उच्च न्यायालयाने केली.

उमेदवारांच्या अशा कृतींमुळे त्यांना र्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज कायद्यांतर्गत पंचायत निवडणूक लढण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते. असे निरिक्षणही न्यालयाने नोंदवले.

न्यायालयाने पुढे म्हणाले की, असे गैरप्रकार उमेदवाराला अपात्र करण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे दुसऱ्या उमेदवाराच्या निवडणुकीच्या विजयापर विपरीत परिणाम झाला हे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.

न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांच्या खंडपीठाने ऑक्टोबर 2022 च्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देताना ही निरीक्षणे नोंदवली. त्या आदेशाद्वारे आबिदा बेगम यांना ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास अपात्र केले होते.

Hiding Property is corruption, candidates who do such should be disqualified Says Karnataka High Court.
Watch Video: बाप मार खातोय अन् चिमुकला रडतोय; हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल

संसदेच्या निवडणुका असोत किंवा राज्य विधानमंडळाच्या असोत किंवा महानगरपालिका असोत किंवा पंचायत असोत त्या महत्त्वाच्या असतात.

ज्या क्षेत्रात एकसमान धोरणे हवी आहेत, अशा सर्व स्तरांवर निवडणुकांमध्ये पारदर्शकता म्हत्त्वाची आहे. हे लक्षात घेत न्यायालयाने हा निर्णय दिला.

त्यामुळे उमेदवार आणि उमेदवाराचा जोडीदार यांनी मालमत्तेचा खुलासा करणे महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Hiding Property is corruption, candidates who do such should be disqualified Says Karnataka High Court.
Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक निवडणुकीपूर्वी बंगळुरु पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटीची रोकड केली जप्त!

या प्रकरणात, न्यायालयाने असे म्हटले की, याचिकाकर्त्याची तिची मालमत्ता, तिच्या पतीची मालमत्ता तसेच इतर अवलंबून असलेल्या सदस्यांची मालमत्ता उघड करणे ही जबाबदारी आहे. असे न केल्यास हा प्रकार भ्रष्ट व्यवहार ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com