Rajnath Singh Dainik Gomantak
देश

Rajnath Singh: युद्धाची गरज पडलीच तर... NCC कॅम्पमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

संरक्षणमंत्र्यांनी एनसीसी कॅडेट्सना संरक्षण मंत्री पदक आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रजासत्ताक दिनापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी शनिवारी (21 जानेवारी) दिल्ली कॅंट भागातील एनसीसीच्या प्रजासत्ताक दिनाच्या शिबिराला भेट दिली. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी एनसीसी कॅडेट्सना संरक्षण मंत्री पदक आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले.

एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले, "कधीही युद्ध लढण्याची गरज भासल्यास संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी असेल."

राजनाथ सिंह म्हणाले, "जलद गतीने बदलणाऱ्या जागतिक सुरक्षा परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाला तयार करण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडत नाही." यावेळी संरक्षणमंत्र्यांनी टीमवर्क बाबत कॅडेट्सना धडे दिले.

भारताने भूतकाळात शत्रूंना पराभूत केले आहे आणि अनेक युद्धे जिंकली हे सांघिक क्षमतेचे फळ आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

"सशस्त्र दल सर्व प्रकारच्या धोक्यांपासून देशाचे रक्षण करत असताना, वैज्ञानिक, अभियंते, नागरी अधिकारी आणि इतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कधीही युद्ध लढण्याची गरज भासली तर संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी असेल. भारताने यापूर्वी आपल्या शत्रूंना पराभूत केले आहे आणि अनेक युद्धे जिंकली आहेत, हे सांघिक कार्याचे उत्तम उदाहरण आहे." असे संरक्षण मंत्री म्हणाले.

बदलत्या काळानुसार स्वत:ला घडवण्याची गरज आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. "जलद गतीने बदलणाऱ्या जागतिक सुरक्षेसंबधित अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. पण, सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाला तयार करण्यासाठी सरकारकडून कोणतीही कसर सोडली जात नाही."असेही सिंह म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 Cricket: 19 वर्षांच्या पोरानं उडवली कांगारुंची झोप! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात घडवला इतिहास; नावावर केला मोठा रेकॉर्ड!

Cyber Fraud: सारवी, कविता, दिनाज, जास्मिन... चौघींच्या प्रेमात 80 वर्षीय मुंबईकर कंगाल, 9 कोटींना घातला गंडा

Viral Video: अजब फॅशन! महिलेने जिवंत बेडकाचे बनवले 'नेकलेस', व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण; तुम्ही पाहिलाय का?

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

SCROLL FOR NEXT