Staff Selection Commission -SSC  Dainik Gomantak
देश

SSC CGL Recruitment 2020-21: मंत्रालय विभागात 7035 पदांची भरती

कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission -SSC) मंत्रालय, विभाग आणि भारत सरकारच्या इतर संस्थांमधील पदांसाठी अर्ज मागविले आहे.

दैनिक गोमन्तक

SSC CGL Recruitment 2020-21: आपण सरकारी नोकरी शोधत असाल तर सरकारने आपल्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. SSC परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. (Staff Selection Commission Recruitment of 7035 posts in the Ministry)

कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission -SSC) मंत्रालय, विभाग आणि भारत सरकारच्या इतर संस्थांमधील गट ब आणि गट सी पदांसाठी 7035 रिक्त पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. एसएससी सीजीएल (SSC CGL) भरती ही पदवीस्तरीय परीक्षा, 2020 च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. एसएससी सीजीएल 2020 ची पदभरती याच महिन्यात जाहीर केली असून ही परिक्षा 13 ते 24 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे.

मंत्रालयात होते सिलेक्शन

एसएससी सीजीएल 2021 हा हॉटस्पॉट आहे जिथे मोठ्या संख्येने उमेदवार येतात. एसएससी सीजीएल नोकरीच्या स्वरूपात आकर्षक पगार देते. या क्षेत्रात करीअर ग्रोथ होण्याची जास्त संधी आहे. पदवी परीक्षेनंतर सर्वात जास्त या पदांसाठी अर्ज केला जातो. एसएससी सीजीएलद्वारे निवडलेले उमेदवार भारत सरकारच्या विविध मंत्रालये / विभाग / संघटनांमध्ये नॉन-टेक्निकल ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सिलेक्ट केले जाते.

एसएससी सीजीएल 2020-21 भरती परिक्षा चार स्तरांमध्ये घेतली जाते. टियर 1 (Tier-1) परीक्षेत शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार टियर 2 (Tier-2) परीक्षेस बसण्यासाठी पात्र ठरतात. ज्यामध्ये 4 पेपर असतात. यापैकी पेपर क्र. 1 आणि पेपर क्र. 2 देणे अनिवार्य असते.

अशी होणार परिक्षा

एसएससी सीजीएल टियर -2 परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे. टियर 3 परीक्षा लेखी परीक्षेच्या स्वरूपात घेतली जाणार असून. तिथे आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न सोडवावे लागतील. तर टियर 4 मध्ये उमेदवाराची कौशल्य विकास चाचणी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी आपण अधिकृत वेबसाइटला ssc.nic.in भेट देवू शकता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT