sri lanka economic crisis officials said thousands of refugees may land in tamil nadu Dainik Gomantak
देश

श्रीलंकेमुळे भारतावर मोठे संकट ओढावण्याची शक्यता

श्रीलंकेतून येणाऱ्या नागरिकांवर प्रोटोकॉलनुसार गुन्हे दाखल

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे तेथील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. गगनाला भिडलेल्या महागाईमुळे लोकांना दोन वेळची भाकरीही मिळत नाहीये. श्रीलंकेतील भुकेने त्रस्त लोकांना आपला देश सोडण्यास भाग पाडले जात आहे. या आठवड्यात अनेक श्रीलंकन ​​तमिळ नागरिक आपला देश सोडून कठीण परिस्थितीत समुद्रमार्गे भारतात आले आहेत. श्रीलंकेतून आणखी स्थलांतर होणार असून दोन ते चार हजार श्रीलंकन ​​नागरिक भारतात येऊ शकतात, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

मंगळवारी, रामेश्वरममधील एका बेटाजवळ आलेल्या श्रीलंकन ​​तमिळांच्या सहा सदस्यीय कुटुंबाची तटरक्षक दलाने चौकशी केल्यानंतर रामेश्वरमजवळील निर्वासित छावणीत पाठवण्यात आले. या सहा जणांमध्ये चार महिन्यांच्या अर्भकाचाही समावेश आहे.

बुधवारी पाच मुलांसह 10 जणांची आणखी एक टीम तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचली. शिवशंकरी या निर्वासितांपैकी एकाने सांगितले की, श्रीलंकेत त्याच्यासाठी जगण्याचा कोणताही मार्ग नव्हता म्हणून त्यांनी देश सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला.

श्रीलंकेत (Sri Lanka) गॅस, स्वयंपाकासाठी इंधन आणि स्टेशनरी विकणाऱ्या दुकानांवर प्रचंड गर्दी दिसून येते. देशात सर्वच वस्तूंचा मोठा तुटवडा आहे आणि रांगेत उभे असलेले संतप्त लोक सध्याच्या परिस्थितीवरुन गोटाबाया राजपक्षे सरकारला (Government) दोष देत आहेत. श्रीलंकेतील परिस्थिती अशीच राहिल्यास 2,000 ते 4,000 शरणार्थी तामिळनाडूत येऊ शकतात असा अंदाज मंडपमच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

श्रीलंकेतून येणाऱ्या लोकांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत

मंडपम येथील श्रीलंकेतील तामिळींचे पुनर्वसन आणि कल्याण आयुक्त जॅसिंथा लाझारस यांनी नुकतीच या निर्वासित छावण्यांना भेट दिली. जेसिंथा म्हणाल्या की, श्रीलंकेतून आतापर्यंत 16 निर्वासित तामिळनाडूत (Tamil Nadu) आले आहेत. श्रीलंकेच्या गंभीर आर्थिक संकटामुळे या सर्वांना देश सोडावा लागला आहे. मात्र भारतात येण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT