Unparliamentary Words | Lok Sabha Speaker Om Birla Dainik Gomantak
देश

असंसदीय शब्द काढून टाकण्याच्या वादावर स्पीकर ओम बिर्ला म्हणाले- एकाही शब्दावर बंदी नाही

संसदेत असंसदीय शब्दांवरून विरोधकांच्या गदारोळात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी अनेक मोठ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

दैनिक गोमन्तक

संसदेत असंसदीय शब्दांवरून विरोधकांच्या गदारोळात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी गुरुवारी अनेक मोठ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. संसदेने कोणत्याही शब्दावर बंदी घातली नसून विरोधकांनी या प्रकरणी कोणत्याही प्रकारे गैरसमज पसरवू नये, असे लोकसभा अध्यक्ष म्हणाले यावेळी म्हणाले. (Speaker Om Birla on controversy over removal of unparliamentary words No word banned)

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, संसदेने कोणत्याही शब्दांवर बंदी घातलेली (Unparliamentary Words) नाहीये, परंतु ज्या शब्दांवर आक्षेप होता ते शब्द काढून टाकण्यात आले आहेत. पुढे स्पीकर ओम बिर्ला म्हणाले की, यापूर्वी अशा असंसदीय शब्दांचे पुस्तक प्रसिद्ध झाले होते, परंतु कागदपत्रांचा अपव्यय टाळण्यासाठी आम्ही हे पुस्तक इंटरनेटवर देखील प्रसिद्ध केले आहे. पुढे बिर्ला यांनी सांगितले की आम्ही काढलेल्या शब्दांचे संकलन देखील जारी केले आहे.

विरोधकांच्या गदारोळाबद्दल ओम बिर्ला म्हणाले की, विरोधकांनी हा 1,100 पानांचा शब्दकोश वाचला आहे का, जर ते गैरसमज पसरवत नसतील तर. हे 1954…1986, 1992, 1999, 2004, 2009, 2010 मध्ये रिलीज झाले आणि हे पुस्तक 2010 पासून दरवर्षी प्रकाशित देखील होत आहे.

ओम बिर्ला म्हणाले की जे शब्द काढले गेले आहेत ते विरोधी पक्ष तसेच सत्तेत असलेल्या पक्षाने संसदेत सांगितले आणि वापरलेले आहेत. केवळ विरोधकांनी वापरलेले शब्द निवडक काढून टाकणे असे देखील नाही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT