दूधसागर धबधबा Dainik Gomantak
देश

पाहा दूधसागर धबधब्याचे 'Sea of Milk' रूप

दूधसागर धबधब्याजवळून (Dudhsagar waterfall) गोव्यात (Goa) जाणारी रेल्वे (Indian Railway) मुसळधार पावसामुळे (Heavy rainfall) मध्येच थांबली.

दैनिक गोमन्तक

दूधसागर धबधब्याजवळून (Dudhsagar waterfall) गोव्यात (Goa) जाणारी रेल्वे (Indian Railway) मुसळधार पावसामुळे (Heavy rainfall) मध्येच थांबली. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हादाई नदीवरचा दूधसागर धबधबा मोठ्या प्रमाणात वाहतांना दिसत असल्याने या ठिकाणी ट्रेनला थांबा घ्यावा लागला. गोव्याला बेंगळुरूशी जोडणारा हा पश्चिम भारतातातला दुधसागर धबधबा आहे तेथून हा रेल्वे ट्रॅक गेला आहे. या रेल्वेतून दिसणारे दूधसागर धबधबव्याचे दृश्य विलोभिय आहे. (South Western Railway halted due to heavy rainfall when passing through Dudhsagar waterfall)

दूधसागर धबधब्याच्या वाढलेला पाण्याच्या प्रवाहाचा एक व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने शेअर केला आहे ज्यामध्ये पावसाळ्यातील दूधसागर धबधब्याचे हे सुंदर दृष्य तुम्ही पाहू शकता. दूधसागर धबधब्याला 'मिल्क ऑफ सी' असेही म्हटले जाते, या ठिकाणी पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रणाणात वरून खाली कोसळत असल्याने सगळीकडे पांढरे धुके बघायला मिळते. दूधसागर धबधब्याच्या सभोवतालचे क्षेत्र पर्णपाती जंगलांनी व्यापलेले आहे त्यामुळे या हा भाग जैवविविधता खूप समृद्ध आहे.

भगवान महावीर अभयारण्य आणि पश्चिम घाटातील मोलेम नॅशनल पार्क मध्ये स्थित दूधसागर धबधबा पश्चिम घाट ते गोवाची राजधानी असलेल्या पणजी पर्यंतच्या म्हादाई नदीच्या प्रवासादरम्यान लागतो. पणजीमध्ये, कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यात उगम पावणारी म्हादाई नदी अरबी समुद्राला जावून भेटते.

दूधसागर धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांमध्ये आहे याची उंची 310 मीटर आहे आणि सरासरी रुंदी 30 मीटर आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागांत येत्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT