AUS vs SA Dainik Gomantak
देश

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Australia Defeated South Africa: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट एका लाजिरवाण्या पराभवाने केला.

Manish Jadhav

Australia Defeated South Africa By 276 Runs: दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट एका लाजिरवाण्या पराभवाने केला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पहिल्या दोन सामन्यांमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाला धूळ चारणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात मात्र आपली विजयाची लय गमावली. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार पलटवार करत दक्षिण आफ्रिकेचा अतिशय दारुण पराभव केला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेच्या नावावर एक अत्यंत लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांची शतकी खेळी

दरम्यान, या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने (Australia) तीन फलंदाजांच्या शतकांच्या जोरावर 50 षटकांत 2 गडी गमावून तब्बल 431 धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड, कर्णधार मिचेल मार्श आणि कॅमेरुन ग्रीन यांनी शानदार शतके झळकावली. ऑस्ट्रेलियाच्या या पहाडासारख्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पूर्णपणे गडगडले आणि संपूर्ण संघ केवळ 24.5 षटकांत 155 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने आफ्रिकी संघाला 276 धावांनी पराभूत करुन मायदेशात क्लीन स्वीप होण्यापासून स्वतःला वाचवले.

दक्षिण आफ्रिकेच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेला (South Africa) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठा पराभव 2023 मध्ये भारताविरुद्ध मिळाला होता. त्यावेळी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला होता. आता भारताचा हा विक्रम ऑस्ट्रेलियाने मोडला आहे. धावांच्या दृष्टीने पाहिल्यास, ऑस्ट्रेलियाचा हा एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी या सामन्यात डेवाल्ड ब्रेविस याने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना कूपर कोनोली याने कहर केला. त्याने एकट्यानेच दक्षिण आफ्रिकेच्या निम्म्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने 6 षटकांमध्ये केवळ 22 धावा देत 5 बळी मिळवले. त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही.

दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जरी ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना जिंकला असला तरी, दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकून 2-1 ने मालिका आपल्या नावावर केली. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टी-20 आणि एकदिवसीय, अशा दोन्ही मालिका खेळल्या जातील. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघाचीही घोषणा केली आहे. या दौऱ्यात त्यांना आपल्या या पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

Rahul Gandhi Video: काय चाललंय? राहुल गांधींना Kiss करुन तरुण पळाला, सुरक्षा रक्षकानं लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT