AUS vs SA: ऑस्ट्रेलियाच्या साम्राज्याला धक्का! कांगारुंना हरवून आफ्रिकेने रचला ‘महा-कीर्तिमान’, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच संघ

South Africa Beat Australia: आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवून वनडे मालिका 2-0 ने जिंकत मोठा पराक्रम केला.
South Africa Team
South Africa Team Dainik Gomantak
Published on
Updated on

South Africa Team Record: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी जागतिक कसोटी मालिकेचा (World Test Series) अंतिम सामना ऑस्ट्रेलियाला हरवून पहिल्यांदाच जिंकला होता. आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवून वनडे मालिका 2-0 ने जिंकत मोठा पराक्रम केला. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने वनडे क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली, ज्यामुळे त्यांचे वर्चस्व सिद्ध झाले.

ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच घरात दारुण पराभव

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यातच दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 98 धावांनी एकतर्फी पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यातही त्यांनी 84 धावांनी विजय मिळवत मालिका खिशात टाकली. दोन्ही सामन्यांतील विजयाचे मोठे अंतर हे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमधील वर्चस्व दर्शवते. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू त्यांच्याच घरच्या मैदानावर पूर्णपणे निष्प्रभ ठरले. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.

South Africa Team
AUS vs SA: कांगारुंविरुद्ध लुंगी एन्गिडीचा मोठा धमाका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला जगातील चौथा गोलंदाज!

वनडे मालिका जिंकण्याचा नवा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सर्वाधिक वनडे मालिका जिंकण्याचा विक्रम आता दक्षिण आफ्रिकेच्या नावावर झाला आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडने 8 मालिका जिंकल्या आहेत. या यादीत भारतीय संघ 6 मालिका विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक द्विपक्षीय वनडे मालिका विजय

  • 9 - दक्षिण आफ्रिका (15 मालिका खेळल्या)

  • 8 - इंग्लंड (21 मालिका खेळल्या)

  • 6 - भारत (14 मालिका खेळल्या)

  • 4 - श्रीलंका (8 मालिका खेळल्या)

  • 4 - पाकिस्तान (11 मालिका खेळल्या)

  • 2 - वेस्ट इंडिज (11 मालिका खेळल्या)

  • 2 - न्यूझीलंड (14 मालिका खेळल्या)

वरील आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते की, दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे.

South Africa Team
AUS vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 'विराट' मात! मोडला आपलाच रेकॉर्ड; गोलंदाजांनी बजावली महत्त्वाची भूमिका

2016 पासून दक्षिण आफ्रिकेचा दबदबा कायम

दरम्यान, 2016-17 पासून वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेची प्रभावी कामगिरी सुरु आहे. या मालिकेद्वारे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची आपली सलग 5 वी वनडे मालिका जिंकली आहे. तसेच, 2016-17 नंतर दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवून मालिका जिंकली. हे यश संघाच्या मानसिक आणि खेळाच्या क्षमतेचे प्रतीक आहे. जागतिक कसोटी मालिकेचा विजय आणि ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेतील विजय, या दोन्ही कामगिरीने दक्षिण आफ्रिकेचा संघ क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावर आपला दबदबा निर्माण करत असल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com