SA vs AUS Dainik Gomantak
देश

SA vs AUS: कांगांरुंची दैना उडवत दक्षिण आफ्रिकेनं मोडला 31 वर्ष जुना रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव, केशव महाराज ठरला विजयाचा 'हिरो'

South Africa Beat Australia: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात दमदार झाली.

Manish Jadhav

South Africa Beat Australia: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात दमदार झाली. पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान ऑस्ट्रेलियाचा 98 धावांनी दारुण पराभव केला असून, मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना 296 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन फलंदाज केशव महाराजच्या भेदक गोलंदाजीपुढे हतबल झाले आणि त्यांचा संपूर्ण संघ 198 धावांवरच गारद झाला.

दक्षिण आफ्रिकेची दमदार कामगिरी

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. सलामीवीर एडेन माक्ररम (82 धावा) आणि रियान रिकेल्टन (33 धावा) यांनी संघाला 92 धावांची मजबूत सलामी दिली. त्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा (65 धावा) आणि मॅथ्यू ब्रीत्झके (57 धावा) यांनीही मोक्याच्या वेळी अर्धशतके झळकावत संघाची धावसंख्या 296 पर्यंत पोहोचवली. या खेळाडूंच्या योगदानामुळेच दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियासमोर 297 धावांचे मोठे आव्हान ठेवता आले. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, मात्र त्याने 57 धावा दिल्या.

ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याप्रमाणे कोसळला

दरम्यान, 297 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार मिचेल मार्शने एकाकी झुंज देत चांगली फलंदाजी केली, मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. मार्शने 96 चेंडूत 88 धावांची अप्रतिम खेळी खेळली, ज्यात 10 चौकारांचा समावेश होता. मार्श वगळता बेन ड्वार्शुईस (33 धावा) आणि ट्रॅव्हिस हेड (27 धावा) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मार्श बाद होताच ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

केशव महाराजची जादुई गोलंदाजी

दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला फिरकी गोलंदाज केशव महाराज. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना असे काही अडकवले की त्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. महाराजने सर्वाधिक 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीची कंबर मोडली. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ केवळ 40.5 षटकांत 198 धावांवरच गारद झाला.

हा विजय दक्षिण आफ्रिकेसाठी ऐतिहासिक ठरला आहे. धावांच्या फरकाने ऑस्ट्रेलियाला (Australia) त्यांच्याच भूमीवर हरवलेला हा दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी, 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाला 82 धावांनी हरवले होते, पण आता हा विक्रम मोडला गेला आहे. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास दुणावला असून, पुढील सामन्यांमध्येही ते अशीच कामगिरी करतील अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Office Yojana: पोस्टाची धमाकेदार योजना! दररोज 50 रुपये गुंतवून बना 'लखपती'; 'या' योजनेतून मिळतो तगडा रिटर्न

Shreyas Iyer: राजकारण जिंकलं, श्रेयस अय्यर हरला... टीम इंडियावर गंभीर आरोप

Viral Video: नदीतून बाहेर येताच पोरीनं घातली लाथ, अतरंगी रीलचा सोशल मीडियावर धूमाकूळ; नेटकरी हैराण

Konkan Tourism in Monsoon: हिरवाई, धबधबे आणि समुद्रकिनारे... पावसात खुललेलं 'कोकण', निसर्गाच्या कुशीतली 10 अप्रतिम स्थळं, नक्की भेट द्या

Goa Police Attack: रस्त्यात अडवून पोलिसांना मारहाण, बेतूल घटनेनंतर वास्कोत 'गुंडाराज'; गोव्यात पोलिसांवर हल्ल्यांची मालिका?

SCROLL FOR NEXT