Sonia Gandhi-Rajiv Gandhi Relationship Dainik Gomantak
देश

Sonia Gandhi Birthday : सोनिया गांधीचं खरं नाव काय? कशी जुळली राजीव आणि सोनिया यांची लव्हस्टोरी, एकदा वाचाच

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आज 9 डिसेंबर रोजी त्यांचा 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

दैनिक गोमन्तक

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आज 9 डिसेंबर रोजी त्यांचा 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सोनिया गांधी यांचे आयुष्य एका रंजक गोष्टीपेक्षा कमी नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव यांची पत्नी म्हणून त्या भारतात आल्या आणि त्यानंतर सर्व कौटुंबिक चढउतारानंतरही त्यांनी स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवले आणि अखेर राजकारणात पाऊल ठेवले. सुरुवातीला जेमतेम हिंदी बोलणाऱ्या सोनिया गांधींनी स्वतःला काँग्रेसचे सर्वात मोठ्या नेत्या म्हणून प्रस्थापित केले आणि त्यांचा दर्जा अजूनही कायम आहे.

एका रिपोर्टनुसार, सोनिया गांधी यांचे खरे नाव एडविज अँटोनिया अल्बिना माइनो आहे, जे त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावर देखील नोंदवले गेले आहे. मात्र, त्यांना सोनिया हे नाव कोणी दिले याबाबत स्पष्ट माहिती नाही. कदाचित राजीव गांधींनी त्यांना हे नाव दिले असावे, असे बोलण्यात येते. सोनिया यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी लुईझियाना, इटली येथे झाला.

1964 मध्ये सोनिया इंग्रजी शिकण्यासाठी ब्रिटनच्या केंब्रिजमध्ये गेल्या, तर राजीव गांधी केंब्रिज विद्यापीठाच्या द कॉलेज ऑफ ट्रिनिटीमध्ये शिकत होते. राजीव आणि सोनिया एका रेस्टॉरंटमध्ये भेटले, जिथे सोनिया अर्धवेळ वेट्रेस म्हणून काम करत होत्या. एके दिवशी राजीव त्याच रेस्टॉरंटमधील या वेट्रेसच्या प्रेमात पडले. आणि अशाप्रकारे सोनिया आणि राजीव यांची प्रेमकहाणी सुरू झाली.

Sonia Gandhi Birthday

3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, राजीव आणि सोनिया यांनी 1968 मध्ये दिल्लीत लग्न केले. हे लग्न अमिताभ बच्चन यांच्या घरी झाल्याचे सांगितले जाते. अमिताभ यांची आई तेजी बच्चन आणि राजीव यांच्या आई इंदिरा गांधी या जवळच्या मैत्रिणी होत्या. या लग्नानंतर सोनिया गांधी भारतात आल्या. राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांनी पक्षाची सर्व धुरा सांभाळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

SCROLL FOR NEXT