Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Marriage: 'तुम्ही मुलगी शोधा...' राहुल गांधींच्या लग्नाच्या प्रश्नावर सोनिया गांधींनी दिलं मजेशीर उत्तर

Rahul Gandhi Marriage News: आगामी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करुन दाखवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

Manish Jadhav

Rahul Gandhi Marriage News: आगामी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करुन दाखवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हरियाणाच्या सोनीपत येथील महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राहुल गांधींनी त्यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी महिला शेतकऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत.

राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हलक्याफुलक्या संभाषणाची एक झलक शेअर केली, ज्यामध्ये एका महिला शेतकऱ्याने सोनिया गांधींना विचारले की, "राहुलजींचे लग्न करुन द्या?"

यावर सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाल्या की, "तुम्ही मुलगी शोधा." सोनिया यांनी महिला शेतकऱ्यांना गंमतीने हे सांगितले, जेव्हा महिला शेतकरी सोनिया गांधींना त्यांच्या निवासस्थानी भोजनाच्या वेळी भेटल्या.

दरम्यान, दिलेले वचन पाळत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सोनीपत जिल्ह्यातील काही महिला शेतकऱ्यांना आपल्या आईच्या घरी बोलावले आणि त्यांच्यासोबत भोजन केले. दुपारच्या भोजनादरम्यान महिला सक्षमीकरण आणि जीएसटी हे चर्चेचे ठळक मुद्दे होते.

राहुल यांनी त्यांची बहीण प्रियंका गांधी वड्रा यांनाही महिला शेतकऱ्यांसोबत भोजनासाठी त्यांच्या निवासस्थानी बोलावले. व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधींनी लिहिले की, "आई, प्रियंका आणि माझ्यासाठी काही खास पाहुण्यांसोबत आठवणीत ठेवणारा दिवस!

सोनीपतच्या शेतकरी बहिणींची दिल्ली भेट. त्यांच्यासोबत घरी भोजन आणि खूप मजा. खूप छान भेटवस्तू "देसी तूप, लस्सी, घरगुती लोणचे आणि भरपूर प्रेम."

दुसरीकडे, 52 वर्षीय राहुल गांधींनी सांगितले की, 'मला लग्नाबाबत काही आक्षेप नाही.' राहुल वडील राजीव आणि सोनिया गांधी यांचा संदर्भ देताना म्हणाले की, "माझ्या पालकांचे लग्न खूप गोड होते आणि त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, त्यामुळे माझ्यासाठी स्टॅंडर्ड खूप हाय आहे."

तसेच, व्हिडिओमध्ये गांधी कुटुंब महिला शेतकऱ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत भोजनाचा आस्वाद घेताना दिसत आहे. राहुल गांधी उपस्थित मुला-मुलींना चॉकलेटचे वाटप करतानाही दिसत आहेत.

व्हिडिओच्या एका भागात राहुल गांधी म्हणाले की, "महिला ही कोणापेक्षा कमी नाही. त्यांनी स्वत:ला मुक्तपणे व्यक्त केले पाहिजे. कोणत्याही भीतीशिवाय!"

व्हिडिओच्या दुसर्‍या भागात प्रियंका गांधी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत असताना दिसत आहेत. त्यांना राहुल गांधींच्या खोड्यांसाठी कसे फटकारले जायचे.

व्हिडिओमध्ये प्रियंका असे म्हणताना ऐकू येते की, "तो गोंडस दिसत आहे, नाही का? तो सर्वात खोडकर आहे आणि मला फटकारले जाते." व्हिडिओच्या शेवटी प्रियंका गांधी महिला शेतकऱ्यांसोबत नाचताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT