Sonia Gandhi gives instruction to congress leader to stop BJP& RSS  Dainik Gomantak
देश

'तरच आपण भाजप आणि आरएसएस हरवू शकू', सोनिया गांधींचा काँग्रेस नेत्यांना कानमंत्र

देशाच्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर काँगेसकडून विविध मुद्दे मांडले जातात , परंतु माझ्या माहितीनुसार ही विधाने जिल्हा-ब्लॉक स्तरावरील तळागाळातील कॅडरपर्यंत पोहोचत नाहीत, असेही सोनिया गांधी म्हणाल्या

दैनिक गोमन्तक

काँग्रेसच्या (Congress) अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी यांची काल दिल्लीत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप (BJP) आणि आरएसएसच्या (RSS) द्वेषपूर्ण प्रचाराचा वैचारिक मुकाबला करावाच लागेल, असा संदेश पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.नुकत्याच झालेल्या CWC बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी मंगळवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ही बैठक घेतली. या बैठकीला राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. यावेळी सोनिया गांधींनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. जर आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर भाजप आणि आरएसएसचे खोटे नाटक लोकांसमोर आणावेच लागेल. असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. (Sonia Gandhi gives instruction to congress leader to stop BJP& RSS)

या बैठीकीत सोनिया गांधीनी, 'आपला इतिहास साक्षी आहे की, अन्याय आणि विषमतेच्या विरोधात एखाद्या संघटनेला यश मिळवायचे असेल आणि उपेक्षितांच्या हक्कांची प्रभावीपणे वकिली करायची असेल, तर ती तळागाळात असली पाहिजे. त्यासाठी व्यापक आंदोलन करावे लागेल.' असे सांगतच पक्ष बांधणीसाठी नेत्यांना तयार राहण्याचे आदेश देखील दिले आहेत.

देशाच्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर काँगेसकडून विविध मुद्दे मांडले जातात , परंतु माझ्या माहितीनुसार ही विधाने जिल्हा-ब्लॉक स्तरावरील तळागाळातील कॅडरपर्यंत पोहोचत नाहीत, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. यासोबतच काही धोरणात्मक मुद्द्यांवर राज्य पातळीवरील नेत्यांमध्येही समन्वय नसल्याची खंतही सोनिया गांधींनी व्यक्त केली आहे. कालच्या बैठकीत अशा अनेक मुद्द्यांना हात घालत सोनिया गांधी यांनी भाजप-आरएसएसच्या प्रचाराविरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल असा आदेशच पक्षाच्या नेत्यांना सांगितले दिला आहे. यासोबतच पक्षातील शिस्त आणि एकता या बाबींवरही पुन्हा एकदा जोर देण्यात आल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

दरम्यान येत्या काही काळात देशात गोव्यासह मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ​विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या पाचही राज्यांतील निवडणूक स्थिती आणि काँग्रेसच्या रणनितीवर या बैठकीत सोनिया गांधींच्या उपस्थितीत चर्चा आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला वारंवार अपयश येत आहे. विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी अपेक्षेनुसार होत नाही. त्याचा फायदा भाजपला मिळत असून, अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत आणि याच अनुषंगाने दिल्लीत झालेली कालची बैठक महत्वाची मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT