Smriti Irani Dainik Gomantak
देश

Smriti Irani: स्मृती इराणींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस आमदाराविरोधात FIR दाखल

Smriti Irani: खासदार स्मृती इराणी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करुन महिलांच्या सन्मानाला धक्का लावण्याचे काम अजय राय यांनी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमन्तक

सोनभद्रच्या सदर कोतवाली पोलिसांनी काँग्रेस नेते अजय राय यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा पुष्पा सिंह यांनी राय यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. खासदार स्मृती इराणी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करुन महिलांच्या सन्मानाला धक्का लावण्याचे काम अजय राय यांनी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, तपासासाठी पोलिसांचे एक पथक वाराणसीला रवाना करण्यात आले आहे.

दरम्यान, अजय राय सोमवारी भारत जोडो यात्रेबरोबर रॉबर्ट्सगंज येथे पोहोचले होते. यादरम्यान ते म्हणाले की, 'स्मृती इराणी (Smriti Irani) अमेठीत येतात आणि लटके झटके मारुन निघून जातात.' या वक्तव्यानंतर भाजप महिलांमध्ये नाराजी आहे. शहर सीओ राहुल पांडे यांनी सांगितले की, 'भाजपच्या (BJP) महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा सिंह यांच्या तक्रारीवरुन काँग्रेस नेते अजय राय यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून पोलिसांचे एक पथक वाराणसीला पाठवण्यात आले आहे.'

राष्ट्रीय महिला आयोगानेही समन्स पाठवले

काँग्रेस नेते अजय राय यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात केलेल्या अशोभनीय वक्तव्याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने अजय राय यांना समन्स पाठवले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आयोगाने अजय राय यांना 28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT