Vishal Dadlani  Dainik Gomantak
देश

"आता नाही जागे झालात, तर कधी...?" सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरुन हटवताच भडकला विशाल ददलानी; देशवासियांना केला थेट सवाल VIDEO

Vishal Dadlani Reaction on Sonam Wangchuk: विशाल ददलानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

Manish Jadhav

Vishal Dadlani Reaction on Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर गेल्या 20 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले लडाखचे ख्यातनाम पर्यावरणप्रेमी आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज (18 जुलै) 21वा दिवस होता. पोलिसांनी केवळ वांगचुक यांनाच तिथून हटवले नाही, तर जंतर-मंतरवर त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या इतर सर्व समर्थकांनाही तिथून निघून जाण्याचे आदेश दिले.

पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे घटनास्थळी वांगचुक यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या धक्कादायक कारवाईनंतर बॉलिवूडमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल ददलानी याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.

विशाल ददलानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. पोलिसांनी वांगचुक यांना ज्या पद्धतीने बळाचा वापर करुन आंदोलनावरुन उठवले, त्यावर विशालने अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. व्हिडिओमध्ये विशाल म्हणाला की, "तुम्ही ही भ्याडपणाची पराकाष्ठा पाहिली का? सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरुन जबरदस्तीने उचलून नेण्यात आले. आज आपल्या देशात जे काही सुरु आहे, ते पाहून माझे मन हेलावून गेले."

देशातील नागरिकांना भावनिक आवाहन करताना तो पुढे म्हणाला, "माझ्या देशवासीयांनो, तुम्ही आता तरी कधी जागे होणार आहात? जर आता नाही जागलात, तर कधीच जागू शकणार नाही. या घडीला मला काय बोलावे हेच सुचत नाहीये, माझी विचार करण्याची क्षमताही संपली आहे. मी त्यांना मदत करण्यासाठी तिथे प्रत्यक्ष हजर राहू शकलो असतो! सध्या संतापामुळे माझे डोके फाटायची वेळ आली आहे." विशालने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही 'आता नाही जागे झालात, तर कधी होणार?' असा थेट सवाल विचारला.

विशाल ददलानीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, नेटकरी आणि वांगचुक यांचे चाहते त्याच्या या भूमिकेचे जोरदार समर्थन करत आहेत. विशेष म्हणजे, सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला बॉलिवूडमधून पाठिंबा मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 20 दिवसांत ऋतिक रोशन, नसीरुद्दीन शाह, सोनाक्षी सिन्हा, प्रकाश राज, स्वरा भास्कर, आदिती राव हैदरी, फातिमा सना शेख, अभय देओल, अनुराग कश्यप आणि इमरान खान यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वांगचुक यांच्या मागण्यांचे आणि संघर्षाचे समर्थन केले.

मात्र, आता वांगचुक यांना थेट रुग्णालयात भरती केल्यानंतर आणि आंदोलन मोडून काढल्यानंतर बॉलिवूडसह देशभरातील संवेदनशील नागरिकांमधून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT