Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

'गांधी घराण्याची सुत्रे बाहेरील कोणीतरी हाती घ्यावी': पीजे कुरियन

दैनिक गोमन्तक

काँग्रेस (Congress) पक्षातील गांधी घराण्याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभेचे उपाध्यक्ष पीजे कुरियन म्हणतात की, गांधी घराण्याबाहेरील कोणीतरी पक्षाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. त्याचवेळी त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याचेही बोलले जात आहे. (Someone from outside should take over the reins of Gandhi family PJ Kurien)

ते म्हणाले की, 'आपल्या जवळच्या नेत्यांशी सल्लामसलत करून ते अनेक निर्णय घेत असतात. पक्ष अशा प्रकारे कधीही पुढे जाऊ शकत नाही. पक्ष वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या नेत्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. खरं तर, काँग्रेस नेते G-23 बद्दल बोलत होते, जे बर्याच काळापासून संघटनेच्या सुधारणांची मागणी करत आहेत. यासंदर्भात त्यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही पत्रही लिहिले होते. विशेष म्हणजे गेल्या 10 विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) एकही राज्य स्वबळावर न जिंकल्याने काँग्रेसमधील संकट अधिकच गडद झाले होताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे कुरियन यांचे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे की, जेव्हा पक्ष सध्याच्या नेतृत्वाविरोधात प्रश्न उपस्थित करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा ठळकपणे प्रयत्न करत आहे. “गेल्या काही काळापासून पक्ष नेतृत्वाविना चालताना दिसत आहे. जेव्हा पक्षाला गांधींची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्यांनी पक्ष सोडला आहे. त्यांच्यामध्ये स्थिरता नाहीये. पक्ष त्यांना पुन्हा जबाबदारी देऊ शकत नाही. आता पक्षाला खंबीर नेतृत्वाचीच गरज आहे

पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या केव्ही थॉमस यांनीही कुरियन यांना पाठिंबा दिला होता. थॉमस म्हणाले की, 'तो जे काही म्हणाला ते सर्व बरोबर आहे.' कुरियन हे पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री देखील होते, आणि ते पाच वेळा लोकसभेचे खासदारही राहिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT