Uttarkashi Accident Dainik Gomantak
देश

Uttarkashi Accident: उत्तरकाशीत बर्फाळ वादळामुळे अपघात, 10 गिर्यारोहकांचा मृत्यू

Uttarkashi Avalanche: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथून एका मोठ्या अपघाताची बातमी येत आहे.

दैनिक गोमन्तक

Avalanche in Uttarkashi: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथून एका मोठ्या अपघाताची बातमी येत आहे. इथे आलेल्या वादळात अनेक गिर्यारोहक अडकल्याचे वृत्त आहे. 23 सप्टेंबर रोजी नेहरु पर्वतारोहण संस्थेतील 40 गिर्यारोहकांची टीम उत्तरकाशीहून द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर रवाना झाली होती. मंगळवारी इथेच हे सर्व जण हिमस्खलनात अडकले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच एनआयएमच्या टीमसह जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ, आर्मी आणि आयटीबीपीचे जवान सक्रिय झाले असून मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami) यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. सध्या 20 गिर्यारोहक तिथे अडकल्याचे सांगण्यात येत आहे.

अहवालानुसार, गिर्यारोहण मोहिमेत एकूण 40 लोक होते. त्यापैकी 33 प्रशिक्षणार्थी, तर 7 प्रशिक्षक होते. अचानक आलेल्या वादळामुळे आणि हिमस्खलनामुळे हे सर्वजण अडकले. आतापर्यंत 3 प्रशिक्षणार्थी आणि 17 प्रशिक्षकांसह 20 जणांची सुटका करण्यात आली आहे.

दुसरीकडे, सीएम पुष्कर सिंह धामी यांनी संरक्षणमंत्र्यांशी बोलून लष्कराची मदत मागितली आहे. लष्कराचे जवानही मदतकार्यात सहभागी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी हवाई दलाने त्यांची दोन चित्ता हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. काही हेलिकॉप्टर (Helicopter) सध्या स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आले आहेत, गरज पडल्यास त्यांचा वापर केला जाईल, असंही सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT