Smriti Mandhana-Palash Muchhal Marriage Dainik Gomantak
देश

Smriti Mandhana Marriage: शुभ मंगल सावधान! स्मृती मानधना-पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तारीख समोर, 'या' दिवशी पार पडणार विवाहसोहळा

Smriti Mandhana-Palash Muchhal Marriage: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार, गायक व दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या चर्चांना सध्या जोर आला आहे.

Sameer Amunekar

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार, गायक व दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर आणि मनोरंजन क्षेत्रात चर्चा सुरू आहे. आता, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याचा दावा केला जात आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार, स्मृती आणि पलाश नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सोहळे २० नोव्हेंबरपासून सुरू होतील, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोघांचे लग्न २० नोव्हेंबर रोजी किंवा त्याच्या आसपास पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप स्मृती किंवा पलाश यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

स्मृती मानधना विश्वचषकात व्यस्त

स्मृती मानधना सध्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व उपकर्णधार म्हणून करत आहे. ती उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून संघासाठी सातत्याने धावा करत आहे. तिच्या कामगिरीचे कौतुक देशभरातून होत आहे. दरम्यान, पलाश मुच्छलही त्याच्या संगीत आणि दिग्दर्शन प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे.

दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले असून, पलाशने अनेकदा स्मृतीला स्टेडियममध्ये उपस्थित राहून पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

पलाश मुच्छल आहेत?

पलाश मुच्छल ३० वर्षीय संगीतकार, गायक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. ते प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल यांचे धाकटे भाऊ असून, पलक हे दिग्गज संगीतकार मिथुन यांच्या पत्नी आहेत. पलाश यांनी "रिक्षा" नावाची वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे आणि राजपाल यादव व रुबिना दिलीक अभिनीत “अर्ध” नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

स्मृती आणि पलाश यांच्या नात्याची अधिकृत घोषणा होईल का आणि २० नोव्हेंबरलाच लग्न होणार का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Orry in Goa: चक्क बनियानवर 'ऑरी' गोव्यात! सोशल मीडियावर Video Viral; म्हणाला, 'माय काईंड ऑफ गोवा डे'

WTC Final: तगड्या मास्टरप्लॅनची गरज! WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला पुढील 9 पैकी किती सामने जिंकावे लागणार?

Sheikh Hasina: फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीना यांना कोर्टाचा मोठा झटका, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुनावली 21 वर्षांची शिक्षा; अवामी लीगचा राजकीय षडयंत्राचा आरोप

Goa Cabinet Decision: खाण व्यवसायाला दिलासा! ट्रकसाठी रस्ता कर सवलत आता 2027 पर्यंत वाढवली; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

Goa Live News: भाजपला हरवायचे असेल, तर अप्रामाणिक नेत्यांची गरज नाही: आमदार व्हेन्झी

SCROLL FOR NEXT