Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
देश

Goa Assembly Election 2022: प्रचारादरम्यान एका मुलीसाठी स्मृती इराणींनी थांबवला ताफा

स्मृती इराणींनी मुलीला मदत तर केलीच पण एका पोलीस अधिकाऱ्याने तिला आपल्या कारमधून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दैनिक गोमन्तक

2022च्या विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) प्रचारासाठी गोव्यात गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी शनिवारी रस्ता अपघातात जखमी झालेल्या एका मुलीला मदत केली. स्मृती इराणींचा ताफा जात असताना एका तरुणीचा अपघात झाला. यानंतर स्मृती इराणींनी मुलीला मदत तर केलीच पण एका पोलीस अधिकाऱ्याने तिला आपल्या कारमधून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले.

या घटनेचा तपशील शेअर करताना भाजपचे मुंबईचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी ट्विट केले आहे की, गोव्यात एका निवडणूक कार्यक्रमातून दुसऱ्या ठिकाणी जात असताना स्मृती इराणी यांच्या ताफ्यामध्ये रस्ता अपघात झाला आहे. त्यानंतर त्यांनी आपला ताफा थांबवला आणि जखमी मुलीला मदत केली, केंद्रीय मंत्र्याने एका पोलिस अधिकाऱ्यासह मुलीला स्वतःच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये पाठवले आणि पायलट कारला थांबवून रस्ता अपघाताचा गुन्हा नोंदवायला सांगितले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की गोव्यातील (Goa) सर्व 40 विधानसभा मरदारसंघाच्या जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, आणि 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार. गोव्यात सध्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. सर्वच पक्ष आपापल्या स्टार प्रचारकांसह रिंगणात उतरलेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सोमवारी दुपारी 1 वाजता गोव्यातील दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील, त्यानंतर ते राज्याची राजधानी पणजीला रवाना होतील, जिथे दुपारच्या जेवणानंतर ते साखळी (Sanquelim) मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

साखळी बाजार येथील बोडके मैदानावर ही जाहीर सभा होणार असून, तेथून मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. या कार्यक्रमानंतर शाह बिचोलीम मतदारसंघातील जनता हॉलच्या मोकळ्या जागेवर भाजपच्या जाहीर सभेसाठी रवाना होणार आहेत. येथे पक्षाने राजेश पाटणेकर यांना उमेदवारी दिली. केंद्रीय गृहमंत्री संध्याकाळी 6.30 वाजता म्हापसा मतदारसंघासाठी रवाना होतील आणि सुमारे 6.55 वाजता घरोघरी प्रचार करतील, यानंतर शाह यांची म्हापसाच्या (Mapusa) टॅक्सी स्टँडवर जाहीर सभा होईल. मापुसातून भाजपचे विद्यमान आमदार जोशुआ पीटर डीसूझा हे निवडणूक लढवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT