Somya Swaminath Dainik Gomantak
देश

''दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या लहान लाटा येऊ शकतात''

लसीकरण केलेल्या किंवा होऊन गेलेल्या व्यक्तींनाही पुन्हा लागण होऊ शकते

दैनिक गोमन्तक

राज्य आणि केंद्र शासन काही दिवसांपूर्वी मंकिपॉक्सपासून बचावासाठी ध्येय - धोरणे ठरवत होते. मात्र गेल्या काही दिवसात देश आणि राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन आता कोरोनाच्या दृष्टीने यंत्रणा सक्रीय करण्यात गुंतले आहेत. त्यामूळे आता कोरोना फैलावास अटकाव हाच केंद्र आणि राज्यस्तरावरील महत्त्वाचा विषय ठरला आहे. (Small waves of corona can occur every four to six months -who )

गेल्या काही महिन्यात अटोक्यात आलेला हा कोरोना परत डोके वर काढताना दिसत आहे. या वाढत्या कोरोनामुळे देशात पुन्हा कोरोनाच्या छोट्या लाटा येऊ शकतात, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.

देशात नव्या रुपातील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या नव्या कोरोनाचे रुप ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आहे. या कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या अशा लहान लाटा येऊ शकतात असेही स्वामीनाथन म्हणाल्या. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासोबतच या नव्या कोरोनाचा शोध घेणेही महत्वाचे असल्याचे मत स्वामीनाथन यांनी व्यक्त केले.

बहुधा हा नवा कोरोना ओमिक्रॉनचे उप-प्रकार असण्याची शक्यता आहे. लसीकरण केलेल्या किंवा अगोदर कोरोना झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा नव्या कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र, जर तुम्ही योग्य काळजी घेतली आणि लसीकरण केले तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.

कोरोना टास्क फोर्सचे तांत्रिक तज्ज्ञ डॉ. संजय पुजारी म्हणाले की, संपूर्ण भारतात ही लाट आहे, असे म्हणणे चूकीचे आहे. कारण वेगवेगळ्या हॉटस्पॉट्समध्ये प्रादेशिक स्पाइक आहेत. या स्पाइक्सचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, युनायटेड स्टेट्समध्ये गेल्या चार ते सहा आठवड्यांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली होती आणि आता गेल्या दोन दिवसांत घट झाल्याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT