Rajya Sabha dainik gomantak
देश

राज्यसभेत सहा नवनिर्वाचित सदस्यांनी पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ

नागालँडमधून एकमेव राज्यसभेवर जाणाऱ्या कोन्याक यांची बिनविरोध निवड

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : काहीच दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांच्या निवडणूका पार पडल्या. त्यात भाजपला चांगले यश मिळाल्याने त्याचा फायदा राज्यसभेत झाला. तर काँग्रेसची या निवडणूकीत पिच्छेहाट झाली मात्र येथेही काँग्रेसच्या खात्यात एक जागा गेल्याने काँग्रेसमध्ये थोडे आनंदाचे वातावरण आहे. अशा प्रकारे आज सोमवारी सहा नवीन सदस्य राज्यसभेत दाखल झाले आहेत. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. (Six newly elected Rajya Sabha MPs, including two from the BJP and one from the Congress)

नुकत्याच 13 राज्यसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुका पार पडल्या. यात भाजपने आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या तीन ईशान्येकडील राज्यांमधून चार राज्यसभेच्या जागा जिंकल्या. तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) ने आसाममधून राज्यसभेची एक जागा जिंकली आहे. केरलमधून (kerala) काँग्रेसने (Congress) एक जागा जिंकली आहे. अशा सहा नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथ घेणार्‍यांमध्ये आसाममधील पवित्रा मार्गेरिटा आणि रंगावरा नरझारी, केरळमधून काँग्रेसचे जेबी माथेर हिशाम, केरळ CPIचे - संदोष कुमार, केरळ CPI-M चे ए.ए. रहीम आणि BJP, नागालँड मधून एस.फान्सगॉन कोन्याक यांनी संसदेच्या वरच्या सभागृहाच्या सदस्यांची शपथ घेतली.

सभागृहात स्थान घेण्यापूर्वी घ्यावी लागते शपथ

सभागृहात आपले स्थान घेण्यापूर्वी, राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला राष्ट्रपती (President) किंवा त्या वतीने नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर शपथ घ्यावी लागते.

राज्यातील पहिल्या महिला

नागालँडमधून (Nagaland) एकमेव राज्यसभेच्या जागेवर भाजपच्या (BJP) एस.फान्सगॉन कोन्याक यांची बिनविरोध निवड झाली आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात स्थान मिळविणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: पंधरा वर्षे पूर्ण झालेल्‍या 28,110 वाहनांचे नूतनीकरण! वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती

Goa Assembly Live: १७ (२) अंतर्गत जमीन रुपांतर नाही!

Astrology Gifts: भेट देताना रास बघा! ज्योतिषशास्त्रानुसार 'या' वस्तू ठरतील बहिणीसाठी शुभ

Goa Politics: खरी कुजबुज; अन्‍यथा विजय पत्रकार झाले असते!

Mahadevi Elephant: कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश! 'महादेवी' नांदणी मठात परतणार; मठ, वनतारा, शासन यांची एकत्रित याचिका

SCROLL FOR NEXT