Karnataka landslide Dainik Gomantak
देश

Karnataka: भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू, अखेरच्या क्षणीही सख्या बहिणी...

कर्नाटकातील उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात भूस्खलनात दोन बहिणींसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Karnataka landslide: कर्नाटकातील उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात भूस्खलनात दोन बहिणींसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन्ही बहिणींचे मृतदेह एकमेकांचे हात हातात धरलेल्या अवस्थेत आढळला आहे.

उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ तालुक्यातील मुत्ताली गावात डोंगराचा भाग कोसळून एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. दुसरी घटना दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुब्रमण्य येथे घडली जिथे दोन बहिणींचे मृतदेह एकमेकांचे हात हातात धरलेल्या अवस्थेत आढळले. डोंगराचा काही भाग घरावर पडल्याने दोन बहिणींचा मृत्यू झाला.

11 वर्षांच्या श्रुती आणि सहा वर्षांच्या ज्ञानश्रीचे मृतदेह दीर्घ बचाव कार्यानंतर बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी हा अपघात झाला असून कुसुमधर असे मृत मुलींच्या वडिलांचे नाव आहे. ते म्हणाले की, सोमवारी संध्याकाळपासून सुब्रमण्य येथे मुसळधार पाऊस पडत होता. सायंकाळी सातच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि घराच्या व्हरांड्यात पुस्तक वाचत असलेली श्रुती आतून आवाज येत असल्याचा विचार करून घराच्या आत धावली.

ज्ञानश्रीही घराच्या आत धावत आली आणि त्याचवेळी त्यांच्या घरावर डोंगर कोसळला. घटनेच्या वेळी किचनमध्ये काम करणाऱ्या मुलींच्या आई मुली बाहेर असतील या विचाराने बाहेर आली, त्यामुळे त्या सुदैवाने बचावली. मात्र या अपघातात त्यांच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाटेत झाडे पडल्याने आणि पाण्यामुळे तात्काळ मदत कर्मचारी घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. पावसामुळे बचावकार्यावरही परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT