MQ-9 Reaper Drone: ज्या ड्रोनने केला अल-जवाहिरीचा खात्मा त्याला भारताची पसंती

Defence News: भारतीय नौदलासाठी अमेरिकेचे स्टेल्थ ड्रोन खरेदी करणार असुन त्यासाठी बायडेन प्रशासनाशी बोलणीही सुरू झाली आहेत.
MQ-9 Reaper Drone
MQ-9 Reaper Drone twitter

अमेरिकेने अल कायदा प्रमुख अलकायदा चीफ अल जवाहिरीला ड्रोन हल्ल्यात ठार केले. जवाहिरीचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने आपले सर्वात प्रगत स्टील्थ ड्रोन (Stealth Drone) आणि धोकादायक क्षेपणास्त्र R9X आणि धोकादायक MQ-9 रीपर ड्रोन वापरले. (India To Get American MQ-9 Reaper Drone News)

या काळात भारतासमोर (India) दुहेरी आव्हाने आहेत. एकीकडे पाकिस्तानी घुसखोर आणि दुसरीकडे भारतीय लष्कराला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी हस्तक्षेपाच्या सततच्या वाढत्या घटनांना तोंड देण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज केले जात आहे. भारताने आपली संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकेकडून ही शस्त्र ड्रोन यंत्रणा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनीही यासंदर्भात बायडन प्रशासनाशी बोलणी सुरू केली आहेत.

MQ-9 Reaper Drone
मायावती भाजपच्या जवळ: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NDA उमेदवार धनखड यांना पाठिंबा

* भारतीय नौदलाला बळ मिळेल

नियंत्रण रेषेवर चीनसोबत (China) सुरू असलेल्या संघर्षाला सामोरे जाणे हे भारतासमोर सध्या मोठे आव्हान आहे. चीनसोबतच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेकडून हे धोकादायक स्टील्थ ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे स्टील्थ ड्रोन खासकरून भारतीय नौदलासाठी खरेदी केले जाणार आहे. भारताला अत्याधुनिक ड्रोन यंत्रणा मिळाल्याने लष्कराच्या ताकदीला नक्कीच वाव मिळेल.

* अमेरिकेचे रीपर ड्रोन इतके धोकादायक का आहे?

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, यूएस एअर फोर्सच्या रीपर ड्रोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे अचूक टार्गेट ठेउन शत्रूला संपवू शकते. हे त्याच्या वेग आणि फायर पॉवरसाठी देखील ओळखले जाते. त्याच वेळी, या ड्रोनचे वजन आफ्रिकन हत्तीएवढे आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, याला स्टिल्थ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. कारण अत्याधुनिक रडारही ते पकडू शकत नाहीत.

याशिवाय, रीपर ड्रोन जोरदार वाऱ्यामध्येही 1700 किलो वजन उचलू शकतात. त्यामुळे हे ड्रोन धोकादायक शस्त्रांनी सुसज्जही असू शकतात. त्याचबरोबर या ड्रोनच्या सहाय्याने शत्रूला हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत लक्ष्य करता येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com