आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India - ECI) मोठा निर्णय घेतला. देशभरातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारांच्या यादीच्या विशेष सुधारणा मोहिमेचा (Special Intensive Revision - SIR) दुसरा टप्पा लवकरच राबवला जाणार असल्याची घोषणा आयोगाने सोमवारी (27 ऑक्टोबर) केली. नवी दिल्लीत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी ही माहिती दिली. बिहारमधील 'एसआयआर' मोहीम यशस्वी झाल्यानंतर आयोगाने 36 राज्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला.
पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Election) होणार आहेत, त्या राज्यांमध्ये ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. यात प्रामुख्याने तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे. यापूर्वी, 6 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी संपूर्ण देशभरात मतदार याद्यांच्या सुधारणेची घोषणा केली होती.
बिहारमधील (Bihar) दोन टप्प्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आयोगाने तिथे 'एसआयआर' मोहीम राबवली. या मोहिमेनंतर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी (Anomalies) असल्याच्या तक्रारी आल्या. बिहारमधील 'एसआयआर' मोहिमेत सुमारे 65 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. यात पुढे आणखी वगळण्या आणि जोडण्या करण्यात आल्यानंतर सुमारे 80 लाख पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली. तसेच, संशयित डुप्लिकेट नावे आणि बनावट पत्त्यांच्या नोंदींमध्येही मोठी वाढ दिसून आली.
या मोहिमेमुळे विरोधी पक्षांनी मात्र आयोगावर जोरदार टीका केली. एवढचं नाहीतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर सरकारचे हस्तक म्हणून काम करत असल्याचा आणि निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांमध्ये फेरफार (Manipulate) करत असल्याचा आरोप देखील केला.
'एसआयआर' (SIR) ही निवडणूक आयोगाने राबवलेली एक व्यापक मतदार यादी अद्ययावत (Updation) करण्याची प्रक्रिया आहे. याचा मुख्य उद्देश, घर-घरात जाऊन पडताळणी करणे आणि एक नवीन व अचूक मतदार यादी तयार करणे आहे. या प्रक्रियेद्वारे, केवळ पात्र नागरिक मतदार यादीत समाविष्ट केले जावेत, याची खात्री केली जाते आणि त्याचबरोबर डुप्लिकेट, मृत आणि अपात्र लोकांची नावे यादीतून वगळली जातात. या मोहिमेला 'विशेष' (Special) म्हटले जाते, कारण ती सामान्य वेळापत्रकाबाहेर आयोजित केली जाते. या मोहिमेत दारोदारी जाऊन पडताळणी, क्षेत्रीय तपासणी आणि अनेक नोंदींची क्रॉस-चेकिंग केली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.